पतसंस्थेतील घोटाळा भोवला : 22 संचालक दोषी, काय आहे नेमकं प्रकरण, किती आहे फ्रॉड...




माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर- : बहुचर्चित संपदा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या अपहार प्रकरणी पतसंस्थेच्या २२संचालकांना वेगवेगळया कलमांखाली कोर्टाने दोषी ठरविले आहे. आरोपींना शिक्षा देणेबाबतची सुनावणी दिनांक ०८/०४/२०२४ रोजी ठेवण्यात आले आहे. सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने अॅड.अनिल ढगे हे काम पाहत आहेत.

संस्थेचे तत्कालीन संचालक ज्ञानदेव सबाजी वाफारे, सुजाता ज्ञानदेव वाफारे, संगिता हरिचंद्र लोंढे, संजय चंपालाल भोर, साहेबराव रामचंद्र भालेकर, अनुप प्रविण पारकर, गोपीनाथ शंकर सूंबे, महेश बबनराव झावरे, सुधाकर गोपीनाथ सुंबे, बबन देवराम झावर, रविद्र विश्वनाथ शिंदे, ज्ञानदेव संभाजी वारवार, हसन अमीन राजे, सुधाकर परशुराम थोरात, भाऊसाहेब कुशाबा झावरे, हरिचंद्र सावळीराम लोंढे, दिनकर बाबाजी ठूबे, लहु सयाजी दांगाडे, संजय चंपालाल बोरा, अनुप प्रविण पारेख, गोपीनाथ शंकर सुंबे अशा बावीस संचालकांना जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर श्री. एन. आर. नाईकवाडे यांनी पतसंस्थेच्या अपहरप्रकरणी दोषी ठरविले आहे.



पतसंस्थेमार्फत कर्जदारांना विनातारण कर्ज वाटप करण्यात आलेले होते. सदर कर्ज नियमबाहय देण्यात आलेले होते. तसेच सोने तारण कर्ज हेही नियमबाहय देण्यात आले होते. तसेच तत्कालीन संचालक मंडळाचे नातेवाईक व कर्मचारी यांनाही बेकायदेशीररित्या कर्ज वाटप करण्यात आलेले होते. वरील आरोपींनी सदर रक्कमेचा अपहार करून सदर रक्कम स्वतःचे फायद्याकरिता वापरली होती. तसेच रकमेबाबत खोटया नोंदी करून सभासदास चुकीची माहिती दिली.

कायदेशिररित्या आर्थिक संस्था चालविताना ठेवीदाराच्या ठेवीचा विनीयोग बेकायदेशिरपणे अटी व नियम यांचे पालन न करता सभासदांच्या ठेवी परत करण्यास असमर्थता दर्शविली. तसेच ठेवीदारांचे रकमेची अफरातफर करून फसवणूक एकुण रक्कम रू.१३,३८,५५,६६७/- केली म्हणून फिर्यादी यांनी आरोपी विरूध्द भा.द.वि. कलम १७७, ४०९, ४१७, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०(ब) व महाराष्ट्र ठेविदारांचे हितसंरक्षण कायदा १९९९ चे कलम ३ प्रमाणे फिर्याद दिलेली होती.


येथील सत्र न्यायालयात सदर खटल्याचे कामकाज होऊन अंतिम युक्तीवाद पूर्ण झाला. आरोपींना आज रोजी न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post