शरद पवारांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले? पालकमंत्री विखे पाटील यांचा सवाल ; जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर...
माय अहमदनगर वेब टीम 

अहिल्यानगर :-  देशात सध्या निवडणुकीचे वातावरण असताना सदरची निवडणूक ही विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याची संधी असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हे स्वप्न पूर्ण करू शकतात यामुळे या निवडणुकीतुन तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करून ही संकल्पना पूर्ण करायची आहे. असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. दरम्यान शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना जिल्ह्यासाठी काय केले? असा सवाल उपस्थित करत देशाचा आणि जिल्ह्याचा विकास साधायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींशीवाय कोणताही पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.


ते नगर येथील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. नगर दक्षिण मतदार संघातून भाजपच्या वतीने विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिल्या नंतर महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. यासाठी जिल्ह्यात ठीकठिकाणी विविध मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर नगर येथील केडगाव येथे राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी कार्यकत्यांना संबोधित करताना पालमंत्री यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. तसेच येणाऱ्या काळात केल्या जाणाऱ्या विकासकामांची माहिती दिली, तर शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना जिल्ह्यासाठी काय केले? असा सवाल सुद्धा विचारला. यामुळे देशाचा आणि जिल्ह्याचा विकास साधायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींशीवाय कोणताही पर्याय नसल्याने ह्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला ऐतिहासिक मतांनी विजयी करून पुन्हा एकदा देशात मोदी सरकार आणण्याचे आवाहन केले. 

तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या वतीने सर्व जिल्ह्यातील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुजय विखे पाटील यांचा ऐतिहासिक विजय मिळवून देण्यास मोठे योगदान देतील असे आश्वासन दिले. तर आमदार संग्राम जगताप यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात केलेल्या कामांचा पाढा वाचत नगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सुजय विखे यांना निवडून आणण्याची जबादारी आपली असल्याचे सांगितले. तर सुजय विखे पाटील यांनी सदरची निवडून ही देशासाठी, आपल्या उज्वल भवितव्यासाठी असून मतदान करताना याचा आपण विचार करावा असे प्रतिपादन केले. 

या कार्यक्रमाच्या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेस  पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण, उपाध्यक्ष नितेश नाहाटा, माजी आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी बाळासाहेब नाहाटा, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा अनुराधा नागवडे, चेअरमन सहकारी जिल्हा बँक, राजेंद्र नागवडे, यांच्यासह अहिल्यानगर आणि विविध तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post