लग्नाचे आमिष दाखवून केला भयंकर प्रकार, पोलिस म्हणतायेत...माय अहमदनगर वेब टीम 

 अहमदनगर - लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर कॅफे व हॉटेलमध्ये अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या पीडित युवतीने याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात नेवासा तालुक्यातील तरूणाविरोधात अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय राजेंद्र वाबळे (रा. नारायणवाडी ता. नेवासा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. सदरची घटना 15 जून 2023 ते 17 मार्च 2024 दरम्यान वेळोवेळी नगर शहरातील बुरूडगाव रस्त्यावरील चाणक्य चौकात असलेल्या रिचकिंग कॅफेत व दौंड रस्त्यावरील हॉटेल राजवीर येथे घडली. सोमवार (दि. 25 मार्च) गुन्हा दाखल झाला आहे. अक्षय याची फिर्यादी युवतीसोबत ओळख झाली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून विश्‍वास संपादन केला. वेळोवेळी रिचकिंग कॅफे व हॉटेल राजवीर येथे घेऊन जात इच्छेविरूध्द अत्याचार केला. दरम्यान युवतीने अक्षयकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. ‘तु माझ्याशी पुन्हा लग्नाबद्दल बोललीस तर मी तुला जिवे ठार मारेल व मी सुध्दा माझ्या जिवाचे काहीतरी करून घेईल’ अशी धमकी दिली.

घडलेल्या घटनेबाबत युवतीने तिच्या आई-वडिलांना माहिती दिली व त्यानंतर कोतवाली पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अक्षय विरोधात अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी कलमानुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अमोल भारती करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post