कबड्डीला कॉर्पोरेट सी एस आर मिळावा यासाठी प्रयत्न केल्यामुळेच लाभले चांगले दिवस - खा. गजानन कीर्तिकर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : कबड्डी हा खेळ जेव्हा त्याला हू तू तू म्हणायचे तेव्हाचा काळ आम्ही गाजवला होता. या खेळात जीवापाड मेहनत करून आम्ही मुंबई त्या काळी गाजवली. शिवसेनेच्या माध्यमातून कबड्डीला बँका, एल आय सी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा कॉर्पोरेट सी एस आर फंड मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यामुळंच आता या खेळाला आता चांगले दिवस आले आहेत. ७० व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत नगरमध्ये कबड्डी च्या माध्यमातून संपूर्ण जग गाजवणाऱ्या द्रोणाचार्य, अर्जुन, खेलरत्न, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त 25 खेळाडूंचा प्रथमच एकत्र सत्कार करण्यात आला . हे कौतुकास पात्र आहे , हे सर्व खेळाडू म्हणजे भारताचे भूषण आहे असे प्रतिपादन शिवसेना द. मुंबईतील खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले. कबड्डीला जे चांगले दिवस प्राप्त झाले ते सर्वानी एकत्र येऊन केल्याचे फलित आहे असे ते म्हणाले.
७० व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कबड्डीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व प्राप्त करून देणाऱ्या २५ द्रोणाचार्य,ध्यानचंद, अर्जुन, खेलरत्न पुरस्कार, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त महान खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
यात इंडियन रेल्वे चे खेळाडू राष्ट्रपती भवन द्वारा सन्मानित १९७२ चे कबड्डी पटू एस एम थोरवे, महाराष्ट्रातून सन्मान झालेल्या पहिल्या महिला कबड्डीपटू शकुंतला पंढरीनाथ खटावकर, महाराष्ट्राचे जेष्ठ कबड्डी पटू शांताराम रंगनाथ जाधव, कबड्डी मधील पहिले पदमश्री, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते डॉ. सुनील डबास , ध्यानचंद पुरस्कार प्राप्त पंजाब चे मनप्रीत सिंग , द्रोणाचार्य पुरस्कार विजेते, आंध्र प्रदेश मधील इ प्रसादराव, हरियाणातील इंडियन सर्व्हिसेस चे बलवान सिंग , क्रिशन कुमार हुंडा, केरळ मधील इंडियन आर्मी सर्व्हिसेस चे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते इ भास्करन तसेच अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूं , माया काशिनाथ मेहेर, इंडिया रेल्वेकडून गौरविल्या गेलेल्या पश्चिम बंगाल मधील रमा सरकार, इंडियन सर्व्हिसेस कडून खेळलेले पंजाब चे हरदीप सिंग, महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते खेळाडू अशोक शिंदे, तामिळ नाडू येथील पी गणेशन, श्रीराम भावसार, इंडियन रेल्वे दिल्लीचे रणधीर सिंग, वेस्ट बंगाल चे विश्वजित पाटील , कर्नाटकातील जेष्ठ कबड्डी पटू, सी होनाप्पा गौडा, बी सी रमेश, इंडियन सर्व्हिसेस राम मेहेर सिंग, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त , भारतीय संघाचा कर्णधार, पोलीस उप अधीक्षक पंकज शिरसाठ, अभिलाषा म्हात्रे, राजस्थान मधील दीपक हुडा, इंडियन रेल्वेचे पवन शेहरावत, यांचा श्री साई बाबांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.
*अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे प्रा. शशिकांत गाडे, जयंत वाघ, विजय मिस्कीन, भास्कर जऱ्हाड, दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर, सदानंद शेटे, आदी यावेळी उपस्थित होते.
*यावेळी द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त किशन कुमार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा कबड्डी असोसिएशन पदाधिकारी आणि त्यांचे सहकारी यांनी खूप चांगले काम केले . आणि या स्पर्धा यशस्वी करून दाखवल्या हे खरोखरच उल्लेखनीय आहे. सर्वानी एकत्र येऊन केल्याचा हा आनंद आहे.*राणा तिवारी यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक प्रा. शशिकांत गाढे यांनी केले तर आभार जयंत वाघ यांनी मानले.
तिसऱ्या दिवशी वाडिया पार्क या ठिकाणी नॉक आउट राउंड नंतर क्वार्टर फायनलचे सामने झाले ४५ विरुद्ध २५ अशी महाराष्ट्राने कर्नाटकवर मात करून सेमी फायमल मध्ये प्रवेश केला.
Post a Comment