Ahmednagar Breaking : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी जीवघेणा हल्ला प्रकरणी तिघांना बेड्या, पाच जणांनी केला हल्ला, असे सांगितले करण...



माय नगर वेब टीम 

अहमदनगर -

सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांना मारहाण करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. आरोपिंना पकडण्याची कामगिरी तोफखाना पोलीस स्टेशनने केली. 

प्रस्तृत बातमीतील हकीगत अशी की, दिनांक ०७/१०/२०२३ रोजी फिर्यादी हेरंब रामचंद्र कुलकर्णी रा. बालाजी चेंबर्स,श्रमीकनगर, सावेडी, अहमदनगर हे व त्यांचे मित्र मोटारसायकलवरुन जात असतांना तीन अनोळखी इसमांनी मोटारसायकलवर येवुन फिर्यादीचे मोटारसायकल अडवुन फिर्यादी व साक्षीदार यांना लोखडी रॉडने जबर मारहाण करुन जखमी केले होते. त्याबाबत तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. १४७४/२०२३ भादवि कलम ३०७, ३२४, ३४१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेऊन मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक श्री. दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर व पोलीस निरीक्षक मधुकर साळवे पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस ठाणे यांना सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन अटक करणेबाबत आदेश दिलेले होते.



नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि / गणेश वारुळे, हेमंत थोरात, पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ / संदीप पवार, बापुसाहेब फोलाने, दत्तात्रय गव्हाणे, दत्ता हिंगडे, पोना/ लक्ष्मण खोकले, विशाल दळवी, रविंद्र कडोले, सचिन अडबल, संतोष खरे, विशाल गवांदे, विजय ठोंबरे, पोकों/सागर ससाणे, रविंद्र घुंगासे चापोहेकॉ संभाजी कोतकर तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे पोसई/ सचिन रणशेवरे, पोहेकॉ / दत्तात्रय जपे, पोना/ अविनाश वाकचौरे, पोकों/शिरीश तरटे, पोकों / सतिष भवर यांचे पथक तयार करुन कारवाई करणेकामी रवाना केले.

पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अहमदनगर शहरातील गुन्हा घडले ठिकाणचे तसेच, निलक्रांती चौक, पत्रकार चौक, प्रेमदान चौक, प्रेमदान हाडको, जोशी क्लासेस येथील सी. सी. टी. व्ही. फुटेज प्राप्त करुन सदर फुटेजच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करता सदरचा गुन्हा हा चैतन्य सुनिल सुडके रा. सुडकेमळा, अहमदनगर याने व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याने निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास अधिक विश्वासात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने सांगितले की, त्याचा मित्र अक्षय विष्णु सब्बन याची सिताराम सारडा विद्यालयाजवळ पानटपरी असून सदर पानटपरी ही अतिक्रमणामध्ये येत असल्याने हेरंब रामचंद्र कुलकर्णी यांनी पानटपरी काढणेबाबत महानगरपालीका येथे अर्ज दिल्याने सदरची पानटपरी काढण्यात आलेली होती. त्याचा राग मनात धरुन अक्षय विष्णु सब्बन याचे सांगणेवरून चैतन्य सुनिल सुडके रा. सुडकेमळा, अहमदनगर, अक्षय पुर्ण नांव माहित नाही, सनि जगधने, एक विधीसंघर्षीत बालक अशांनी मिळून केला. असल्याचे सांगितल्याने सदर इसमांचा शोध घेता इसम नामे अक्षय विष्णु सब्बन दातरंगे मळा, विटभट्टीजवळ, ता. जि. अहमदनगर, चैतन्य सुनिल सुडके सुडकेमळा, अहमदनगर,  एक विधीसंघर्षात बालक असे मिळून आले असुन इसम नामे अक्षय पुर्ण नांव माहित नाही (फरार)  सनि जगधने पुर्ण नांव पत्ता माहित नाही (फरार) यांचा शोध घेता ते मिळुन आलेले नाही. मिळुन आलेल्या इसमांना पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहोत.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खरे , अनिल कातकाडे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post