भारतीय परंपरा व संस्कृतीचे जतन महत्त्वाचे- प्राचार्या सौ. मनीषा पवार जेऊर प्री- स्कूलमध्ये 'पतंग महोत्सव' उत्साहात साजरा

माय अहमदनगर वेब टीम 


 नगर तालुका (शशिकांत पवार)- भारतीय सण, परंपरा व संस्कृती जगात महान असून त्यांचे जतन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जेऊर येथील यशश्री प्री- स्कूलच्या प्राचार्या सौ. मनीषा पवार यांनी केले.

      यशश्री प्री- स्कूलमध्ये मकर संक्रांत सणानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी बोलताना प्राचार्या सौ. मनीषा पवार यांनी भारतीय संस्कृती व सणांचे महत्त्व पटवून दिले. आपली संस्कृती जगात महान संस्कृती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे संस्कृतीचे जतन होणे गरजेचे आहे.

   तरुण पिढी पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करत असल्याने त्याचे दुष्परिणाम आपण पाहत आहोत. आपले सण, उत्सव, परंपरा मोठ्या उत्साहात साजरे करून नवीन पिढीसमोर आदर्श ठेवण्याची गरज असल्याचेही सौ. पवार यांनी सांगितले. मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात येत असून या सणाच्या दिवशी महिला शेतात आलेल्या धान्याचे वाण म्हणून भेट देत असतात.



     यशश्री प्री- स्कूलच्या संचालिका सौ. अनुरिता शर्मा, यश क्रिएटिव्हचे अध्यक्ष यश शर्मा, क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अर्चना कर्डिले व डॉ. दिपाली वाबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी पतंग महोत्सव, तिळगुळ वाटप, उखाणे, गाण्यांच्या अंताक्षरी व हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

     यावेळी स्कूलमध्ये आकर्षक सजावट तसेच बनविलेल्या विविध कलाकृती, रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. कार्यक्रमासाठी महिला पालकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका राजश्री तोडमल, दीपा पवार, दिपाली बनकर, वेदिका मगर, अंजली धनवळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

---------------------------



 प्रत्येक सणाला शास्त्रीय महत्त्व

 देशातील प्रत्येक सणांना धार्मिकतेबरोबर शास्त्रीय महत्त्व आढळून येत आहे. संक्रांत सणासाठी सर्व भाज्या शेतात उपलब्ध असतात. तसेच बाजरीच्या भाकरी मुळे शरीरातील उष्णता वाढते. असे फायदे या सणाचे आहेत. सणांचे महत्त्व बालपणीच विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने अकॅडमीत सर्व सण, उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.

..... सौ अनुरीता शर्मा ( संचालिका यशश्री अकॅडमी)

--------------------

 विद्यार्थ्यांवर संस्कार महत्त्वाचे 

बालवयातच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होणे गरजेचे असते. बालवयात अभ्यास, खेळ, आरोग्य, सण, उत्सव, संस्कृती या बाबींविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळाल्यास त्यांना आयुष्य जगताना तसेच समाजात वावरताना निश्चित फायदा होतो. त्यासाठी यशश्री अकॅडमी नेहमीच प्रयत्नशील असते.

...... राजेंद्र पवार ( क्रीडा मार्गदर्शक यशश्री अकॅडमी)

________________

प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

यशश्री अकॅडमी मध्ये नूतन वर्षाकरिता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. जेऊर प्री- स्कूल जेऊर व सावेडी प्री-स्कूल मध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊन उज्वल भवितव्य घडवावे. असे आवाहन यश क्रिएटिव्हचे अध्यक्ष यश शर्मा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

_______________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post