माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका (शशिकांत पवार)- नगर तालुक्यातील धनगरवाडी येथील यशश्री अकॅडमी संचलित सावेडी प्री-स्कूल मध्ये मकर संक्रांती निमित्त आयोजित पतंग महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पतंग महोत्सवाचा कार्यक्रम यश क्रिएटिव्हचे अध्यक्ष यश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली संचालिका सौ. अनुरीता शर्मा, सचिव गणेश शर्मा, प्राचार्या तानिया वाधवाणी, क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र पवार, व्यवस्थापिका प्रज्ञा जोशी, प्राचार्य सिरील पंडित, उप प्राचार्या अरूषा कोल्हटकर, योगा शिक्षक उमेश झोटिंग, माजी विद्यार्थिनी दिया जासूद यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
पतंग महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चायना मांजा व प्लॅस्टिक पतंगांना टाळून कागदी पतंगांनी महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आकर्षक साजावट, याबरोबरच विविध उपक्रम राबविण्यात आले. पतंग व खाद्यपदार्थाचे स्टॉल उभारण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना यश शर्मा यांनी सांगितले की, मकर संक्रांतीचे मुख्य आकर्षण पतंग असते. परंतु चायना मांजा वापरल्याने विविध पक्षी जखमी, मृत्यू पावत असतात तर दुचाकीस्वार जखमी होत असल्याने चायना मांजाचा वापर करू नये. तसेच प्लास्टिकच्या पतंगाचा वापर टाळुन प्रदूषण टाळावे. सण, उत्सव साजरे करताना प्रदूषण व पशु पक्षांचा विचार करणे गरजेचे आहे. सृष्टीचक्र व्यवस्थित चालण्यासाठी पृथ्वीवरील प्रत्येक घटक, जीव महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपण देखील काळजी घेतली पाहिजे.
पतंग महोत्सव कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने पालक व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावेडी प्री- स्कूलचे सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. पालकांनी पतंग महोत्सवात चांगला प्रतिसाद दिला.
_____________________
प्रवेश घ्या अन् निश्चित व्हा....
यशश्री अकॅडमीत सावेडी प्री-स्कूल व जेऊर प्री- स्कूल मध्ये नवीन वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊन त्यांची जबाबदारी आमच्यावर सोपवा. विद्यार्थ्यांचा अभ्यास, खेळ, संस्कार, आरोग्य याबाबत अकॅडमी काळजी घेऊन 'सर्व गुण संपन्न' विद्यार्थी घडविण्याचे कार्य अकॅडमी व्यवस्थापन व शिक्षकांच्या मदतीने आम्ही करत आहोत. त्यामुळे पालकांनी पाल्याचा प्रवेश घेऊन निश्चिंत राहावे.
......सौ. अनुरीता शर्मा (संचालिका यशश्री अकॅडमी)
______________________________
येथे घडतात "आदर्श विद्यार्थी"
यशश्री अकॅडमी मध्ये मुलांचे ॲडमिशन घेतलेले आहे. प्रवेशानंतर मुलांचा अभ्यास तसेच संस्कारात लगेच फरक जाणवतो. विद्यार्थ्यांच्या हितासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. उच्चशिक्षित शिक्षक व विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष यामुळे विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती दिसून येते. येथील शिक्षण व उपक्रम खरोखरच आदर्श विद्यार्थी घडवत आहेत. अशा प्रतिक्रिया उपस्थित पालकांनी दिल्या.
_____________________________