आमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध

 माय अहमदनगर वेब टीम


 नगर तालुका- आमदार निलेश लंके यांनी बुधवार दि. ७ डिसेंबर पासून महामार्ग दुरुस्तीसाठी उपोषण सुरू केले आहे. अहमदनगर शहराला जोडणारे रस्ते अहमदनगर-पाथर्डी -शेवगाव- नांदेड निर्मल रस्ता, अहमदनगर -राहुरी -कोल्हार -शिर्डी- कोपरगाव रस्ता, अहमदनगर -मिरजगाव- चापडगाव -करमाळा -टेंभुर्णी रस्ता या तीनही रस्त्यांची फार दुरावस्था झाली असल्याने रस्ता दुरुस्ती करण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी उपोषण सुरू केले आहे.

    आमदार लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी युवा नेते अजय लामखडे, विळद सरपंच संजय बाचकर, खारे कर्जुने उपसरपंच अंकुश शेळके यांच्या नेतृत्वाखाली देहरे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात आमदार लंके यांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी करण्यात आली.

     तसेच रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याने घडलेल्या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे. घरातील कर्त्या व्यक्तीचे अपघातात निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे आमदार निलेश लंके यांची मागणी रास्त असून ती लवकरात लवकर मान्य करावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. आंदोलनामध्ये देहरे, विळद, निंबळक, खारे कर्जुने पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_____________________________

सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी वेळप्रसंगी जेलमध्ये जावु

रस्त्यांची झालेली दुरावस्था व त्यासाठी आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेले उपोषण हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आमदार निलेश लंके यांची मागणी तात्काळ मान्य झाली नाही तर आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी जेलमध्ये जावु.

......अजय लामखडे (युवा नेते)

_____________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post