महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तारीख जाहीर; नगरमध्ये रंगणार आखाडा माय अहमदनगर वेब टीम -

अहमदनगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धा वाडियापार्क  येथे २५ ते ३१ डिसेंबरमध्ये रंगणार आहेत. स्पर्धा आयाेजनाचे पत्र राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आमदार संग्राम जगताप यांनी स्वीकारले. 

महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेचे अहमदनगर शाखेचे जिल्हाध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी अहमदनगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन व्हावे, यासाठी राज्य संघटनेकडे पत्रव्यवहार केला होता. याचदरम्यान राज्य संघटनेने वाडियापार्क क्रीडा मैदानाची पाहणी केली होती. 


मानाची गदा शरद पवार यांच्या हस्ते दिली जाणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाचे पत्र आमदार जगताप यांना दिले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा शरद पवार यांच्या हस्ते दिली जाणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post