स्वतःशी लग्न करणारी अभिनेत्री प्रेग्नन्ट?माय नगर वेब टीम

अगदी काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजनवरील एक अभिनेत्री चर्चेत होती स्वतःशी लग्न केल्याच्या करण्यावरून. स्वतः तिने याबाबतची घोषणा केली होती त्यानंतर सोशल मीडियावर तिच्याबाबत बरीच चर्चाही झाली. अनेकांनी यावर चांगल्या, तर अनेकांनी वाईट कमेंट्स केल्या. स्वतःशी लग्न करणं ही कॉन्सेप्ट आता लोकांसाठी नवीन राहिलेली नाही. मात्र, हीच कनिष्का आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता चर्चेत येण्याचं कारण आहे प्रेग्नेंसीबाबतचे प्रश्न. खरंच सेल्फ मॅरेज म्हणजे स्वतःशी लग्न करणारी कनिष्का प्रेग्नन्ट आहे का? असेल तर हे कसं शक्य आहे असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात आलेच असतील. मात्र खरंच असं आहे का? याबाबत स्वतः कनिष्कानेही उत्तर दिलं आहे. 

कनिष्क सध्या न्यूयॉर्कमध्ये असल्याचं समजतं. न्यूयॉर्कमध्ये एका पार्कमध्ये चिल करतानाचे फोटो तिने शेअर केले आहेत. या फोटोंवरून सर्व चर्चा सुरु झाल्यात. कारण या फोटोमध्ये कनिष्काचं टमी बंप  पाहायला मिळतंय. आता टमी बंप दिसल्यावर नेटकरी थोडेच थांबणार होते. त्यांनी थेट प्रश्नांची सरबत्ती लावली. कनिष्का प्रेग्नन्ट आहे का असं नेटकाऱ्यानी विचारण्यास सुरुवात केली. यावर कणिष्कानेही नेटकऱ्यांना उत्तर दिलंय. कनिष्का म्हणते, " मी सेल्फ मॅरीड आहे, सेल्फ प्रेग्नन्ट नाही." 

तुम्हाला नीट आठवत असेल तर ही तीच कनिष्का आहे जिने सर्व चौकटी मोडीत काढत सोशल मीडियावर पोस्ट टाकलेली. "मी कुणाही पुरुषाशी नाही तर स्वतःशी  लग्न करतेय", असं सांगत तिने सर्वांना चकित केलेलं.कनिष्काच्या गळ्यात मंगळसूत्र, डोक्यावर सिंधूर असणारा फोटो देखील व्हायरल झालेला. ही कनिष्क आता न्यूयॉर्कमध्ये राहत असल्याचं समजतं.   

कनिष्का ही सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. स्वतःच्या पर्सनल आयुष्यातील अनेक बाबी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. पुन्हा एकदा सोशल मीडियाचा सहारा घेतला. कनिष्काने न्यूयॉर्कमध्ये फिरतानाचे फोटो शेअर केला आहेत. या फोटोंमध्ये कनिष्का जीन्स आणि टीशर्ट घालून मस्त पोज देताना पाहायला मिळाली. आता स्किनी टॉप घातल्याने कनिष्काचं टमी पाहायला मिळतंय. हेच फोटो पाहून लोकांनी कनिष्काला प्रश्न विचारले आणि तिनेही थेट उत्तर दिलं. 

कनिष्का म्हणाली...

तिने या नेटकर्यांना उत्तर देत म्हंटलं आहे की, "मी सेल्फ मॅरीड आहे, सेल्फ प्रेग्नन्ट नाही. हा फक्त पिझ आणि बर्गरचा परिणाम आहे. या सर्व गोष्टी खाल्ल्याने माझं वजन वाढलंय. मात्र, मला हे आवडतंय" असं कनिष्का म्हणते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post