माय नगर वेब टीम
नवी दिल्ली - प्रसिद्ध फलंदाजाला बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. हा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज दानुष्का गुनाथिलका आहे. क्रिकेटपटूला अटक केल्यामुळे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
दानुष्का गुनाथिलका सिडनीतून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी 4 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. रविवारी सकाळी श्रीलंकेचा संघ त्याच्याशिवाय आपल्या देशाला रवाना झाला.
गुणतिलकाला तीन आठवड्यांपूर्वी दुखापत झाली. त्यांच्या जागी अशेन बंडारा याला संघात घेण्यात आलं होतं. मात्र संघ व्यवस्थापनाने त्यांना घरी पाठवण्याऐवजी संघासोबतच ठेवलं होते.
गुणतिलकाच्या विरोधात 29 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुणतिलका आणि पीडित महिलेची ओळख एका डेटिंग ऍपच्या माध्यमातून झाली.
ऑस्ट्रेलियन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणतिलकाला बुधवारी संध्याकाळी महिलेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याला रविवारी सकाळी सिडनीच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमधील टीम हॉटेलमधून अटक करण्यात आली. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Post a Comment