रस्त्याचे काम न झाल्यास नगरसेवकपदाचा राजीनामा

 


माय नगर वेब टीम

अहमदनगर - बोल्हेगाव रस्त्याकरीता स्व. अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन केले आहे. बोल्हेगाव गणेशचौक ते राघवेंद्र स्वामी  रस्त्याचे काम रखडलेले आहे. याबाबत आयुक्ताना  जाब विचारला असता त्यांनी स्टॅडीग मध्ये प्रस्ताव गेला आहे. त्यावर सही झाली की काम सुरू होईल. परंतू मनपा फंडातून काम होईल का असे विचारल्यास आयुक्त निरउत्तर झाले. त्यामुळे १५ दिवसात काम न झाल्यास नैतिकता म्हणून मी नगरसेवक पदाचा राजीनामा देणार आहे, लोक आम्हाला बोलत आहेत. आयुक्त प्रशासन काम करत नसतील तर १५ दिवसानंतर आम्ही मोठे आंदोलन करणार आहोत जे नगरकरांनी कधीच पाहीले नसेल.


यावेळी शिवसेना शहरप्रमुख  माजी नगरसेवक दिलीप सातपुते , जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाले, अमोल हुंबे, काका शेळके, मदन आढाव, चंद्रकांत उजागरे, अभिषेक भोसले, संजय छजलानी, रवींद्र लाल बोंद्रे, सुनील लाल बोंद्रे, प्रशांत डावरे,  मुकेश जोशी, ओमकार जाधव, विशाल गायकवाड, सागर वाळके, लखन केसळकर,  प्रेम शिंदे, अभिषेक गायकवाड, तुषार शिंदे, ओमकार कांबळे, तारीक कुरेशी आदी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post