सलमान खान-ऐश्वर्या राय यांच्यात पुन्हा एकदा टक्कर; किसी का भाई किसी की.....

 


माय नगर वेब टीम 

मुंबई -बॉलिवूडमध्ये एका वर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. काही चित्रपटांचे विषय खूपच चांगले असतात मग अनेकदा एकाच वेळेस जेव्हा 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होतात तेव्हा मोठा प्रश्न मेकर्स पुढे उभा राहतो. पण मात्र प्रेक्षकांची उत्सुकता वाढते. अनेकदा एकाच वेळीस रिलीज होणाऱ्या चित्रपटांमुळे प्रोड्यूसरसमध्ये वाद देखील पाहायला मिळतात. असाच सामना सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंडमध्ये रंगणार आहे. आणि हा सामना 2023 मध्ये होणार आहे.


आम्ही तुम्हाला सांगत आहोत, एकेकाळी चर्चेत असणारं कपल सुपरस्टार सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय यांच्याबद्दल, ज्यांचे चित्रपट 2023 मध्ये आमनेसामने येणार आहेत. सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' आणि ऐश्वर्या रायचा 'पोनीं सेल्वन 2' पुढील वर्षी एप्रिलमध्ये रिलीज होणार असून त्यांच्यात संघर्षाची चर्चा सुरू झाली आहे. जेव्हा जेव्हा बॉक्स ऑफिसवर मोठ्या चित्रपटांची टक्कर होते तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता वाढते. 


हे दोन्ही चित्रपट एका आठवड्याच्या फरकाने प्रदर्शित होणार आहेत. पहिल्या ईदला, 21 एप्रिल 2023 रोजी, सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' पडद्यावर येणार आहे. याच्या आसपास कोणताही मोठा चित्रपट येण्याची शक्यता नाही, असे आतापर्यंत मानले जात होते. परंतु ताज्या अहवालांवर विश्वास ठेवला तर, ऐश्वर्या राय स्टारर 'पोनियिन सेल्वन 2' पुढील आठवड्यात 28 एप्रिल रोजी या चित्रपटाशी टक्कर देणार आहे. वरवर पाहता, एवढा मोठा चित्रपट अचानक समोर आल्यावर सलमान खानच्या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसचे गणित बिघडते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post