खडकीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा



अप्पर पोलीस अधीक्षक सुभाष निकम यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

 माय अहमदनगर वेब टीम -

सुभाष आप्पासाहेब निकम ,अप्पर पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग(CID), पुणे यांना त्यांनी आजवर केलेल्या कार्याची दखल घेत राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला हे सन्माननीय पदक जाहीर आहे.

सुभाष आप्पासाहेब निकम यांचे मूळ गाव खडकी ता.नगर असून त्यांचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी, सातारा सैनिक स्कूल आणि अहमदनगर महाविद्यालयात झाले. त्यांनी आजवर ३३ वर्ष विविध पदांवर पोलीस खात्यात सेवा केली आहे.१९८९ मध्ये एमपीएससी मार्फत सरळ सेवा भरती मधून पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवेची सुरुवात त्यांनी नक्षल विरोधी अभियान अंतर्गत चंद्रपूर मधून केली. त्यानंतर बीड, औरंगाबाद, पुणे, नवी मुंबई आणि गुन्हे अन्वेषण विभागात सेवा करताना अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले. प्रामुख्याने ८ उघडकीस न आलेले खुनाच्या गुन्ह्याची उकल करून त्यांनी मोठा नावलौकिक प्राप्त केला होता.त्यांना आजवर  विशेष सेवा पदक, आंतरिक सुरक्षा पदक आणि पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाने   सन्मानित करण्यात आलेले आहे.

पुणे- चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यात तपासासाठी राज्य सरकारचा उत्कृष्ट तपास पुरस्कार मिळालेला आहे. सेवा निवृत्त प्राध्यापक रामदास वामन यांचे जावई आहेत. त्यांच्या या यशामध्ये त्यांना पत्नी स्मिता यांचे मोठे पाठबळ मिळाले. त्यांच्या या यशाबद्दल  रितेश कुमार, ADG CID, पुणे, संजय कुमार ADG, प्रशिक्षण आणि खास पथके, म. राज्य, मुंबई, संजीव कुमार सिंघल, ADG, Establishment म. राज्य, मुंबई, अतुलचंद्र कुलकर्णी, ADG, NIA, नवी दिल्ली यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.अहमदनगर जिल्ह्यात आजवर राष्ट्रपती पोलीस पदक मिळणारे मोजकेच अधिकारी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल खडकी ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीण कोठुळे, उपसरपंच आदिनाथ गायकवाड यांच्यासह ग्रामस्थानकडून अभिनंदन केले जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post