नवनागापुर गणात संजना लामखडे यांच्या भुमिकेकडे सर्वांचेच लक्ष ! संजना लामखडे यांच्या निर्णयाने गणातील समिकरणे बदलणार : लामखडे यांची विरोधकांना धास्ती

माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका - नगर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या गट रचनेत नव्याने अस्तित्वात आलेल्या नवनागापुर गटातील निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले असून येथील निवडणूक चुरशीची ठरणार यात शंका नाही. नवनागापुर गण नगर शहर तसेच औद्योगिक वसाहती लगतच्या गावांनी मिळुन तयार झालेला आहे.नवनागापुर गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला असुन येथे इच्छुक उमेदवारांबाबत तर्क वितर्क लावण्याचे काम राजकीय आखाड्यात सुरु झाले आहेत.

    नवनागापूर गणात निंबळक, नवनागापूर तसेच इसळक गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे निंबळक गावचे माजी सरपंच स्वर्गीय विलासराव लामखडे यांच्या पत्नी संजना लामखडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. स्वर्गीय विलासराव लामखडे यांनी निंबळक गावच्या सरपंच पदाची धुरा दहा वर्षे सांभाळली होती. त्यांच्या कार्यकाळात गावच्या विकासासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाची तालुक्यातच नव्हे तर राज्यात चर्चा झालेली आहे. निंबळक गावच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या स्वर्गीय विलासरावांवर निंबळक पंचक्रोशीतील नागरिकांचे अमाप प्रेम होते. स्वर्गीय विलासराव लामखडे यांनी निंबळक गावाला आपले कुटुंब समजून गावाचा सर्वांगीण विकास, गोरगरीब जनतेची सेवा तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांचा देखील विचार करून सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला होता. लहान थोरांसह, महिला अबाल वृद्ध सर्वांच्याच मनात स्वर्गीय विलासराव घर करून गेले आहेत. 

      आजही स्व. विलासराव लामखडे यांचे अनेक कार्यकर्ते तसेच त्यांना राजकारणात आपला गुरु मानणारे कार्यकर्ते देखील नवनागापूर गणात गावपातळीवरील राजकारणात सक्रिय आहेत. स्व. विलासराव लामखडे यांच्या स्नुषा सौ. प्रियंका लामखडे या सध्या निंबळक गावच्या विद्यमान सरपंच म्हणून गावची धुरा सांभाळत आहेत. स्व. विलासराव यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजसेवेचा वसा अंगीकारलेल्या सौ. प्रियंका लामखडे यांच्या नेतृत्वाखाली निंबळक गावचा कायापालट होताना दिसून येत आहे. निंबळक गावच्या विकासासाठी ठोस निर्णय घेण्यात सौ. प्रियंका लामखडे या नेहमीच अग्रस्थानी असतात. निंबळक गावच्या सर्व प्रभागांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने 'व्हिजन' ठरवून त्यांचे राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे.

      निंबळक गावात अनेक ऐतिहासिक लक्षवेधी असे निर्णय घेण्यात आले आहेत. त्या निर्णयाची संपूर्ण तालुक्यात चर्चा होत असून निंबळक गाव हे तालुक्यातील इतर गावांना आदर्शवत असे ठरत आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य तसेच ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे गाव विकासासाठी अडचण येत नसल्याचे सौ. प्रियंका लामखडे आवर्जून सांगत असतात. त्यांना मिळालेला आदर्श सरपंच पुरस्कार हा माझा नसून संपूर्ण गावाचा असल्याचे सौ. प्रियंका लामखडे यांनी ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराच्या वेळी सांगितले. त्यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.

      निंबळक गावासाठी वाढीव पाण्याचा कोटा मिळवण्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा करणाऱ्या सौ. प्रियंका लामखडे या महिला सरपंचाचा निश्चितच सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे. नुसता पाठपुरावाच नाही तर वाढीव कोटा मंजूर करून आणून निंबळक गावाला भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात सौ. प्रियांका लामखडे व त्यांचे ग्रामपंचायतीतील सहकारी यांना मोठे यश आलेले आहे. निंबळक गाव विकासासाठी नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, पथदिवे,, रस्ते, गटार योजना, चौक सुशोभीकरण, ग्रामपंचायत सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा ठराव, महिलांची ग्रामसभा, प्रभाग निहाय ग्रामसभा तसेच गटतट सोडून गाव विकासाबाबत एकत्रित घेण्यात आलेले निर्णय, विकास कामात राजकारण बाजूला ठेवून फक्त गावच्या विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायत मार्फत सुरू असलेले कार्य. यामुळे निंबळक गावाने तालुक्यात नावलौकिक मिळवलेला आहे.

       स्वर्गीय विलासराव लामखडे यांचे चिरंजीव युवा नेते अजय लामखडे यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान तर संपूर्ण तालुक्याला माहितीच आहे. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्राला नेहमीच मदतीचा हातभार लावणारे अजय लामखडे निंबळक गटातील तसेच नवनागापूर गणातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत.. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनीही स्वतःला समाजसेवेसाठी वाहून घेतलेले आहे. वडिलांच्या स्मरणार्थ पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी मोक्षरथ तसेच विविध ठिकाणी गोरगरिबांना नेहमीच निस्वार्थी मदत करणारे अजय लामखडे यांची नवनागापूर गटात स्वच्छ प्रतिमा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणातील बाळकडू व समाजसेवेचे धडे अजय लामखडे यांना घरातूनच मिळालेली देणगी आहे. मुरब्बी राजकारण्याप्रमाणे कोणत्याही समस्याचे निराकरण करण्याचे कसब, गोरगरिबांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे कार्य अजय लामखडे अविरतपणे करत आहेत. नवनागापूर गट व गणातील समस्यांचा गाढा अभ्यास व त्या समस्यांचे निराकरण करण्याचे कसब अजय लामखडे यांनी आत्मसात केलेलेच आहे. त्यांच्याकडे अभ्यासु नेतृत्व म्हणून पाहिले जाते. 

    नवनागापुर गणातुन स्व. विलासराव लामखडे यांच्या पत्नी संजना लामखडे यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा घडत आहेत. संजना लामखडे यांनी नवनागापुर गणातुन पंचायत समितीची उमेदवारी करावी असे अनेक कार्यकर्ते मागणी देखील करत आहेत. स्व. विलासराव लामखडे यांचे गावासाठी दिलेले योगदान, विद्यमान सरपंच प्रियंका लामखडे यांचे ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य व अजय लामखडे यांच्या पाठीमागे असलेली तरुणांची फळी व गट तसेच गणातील दांडगा जनसंपर्क यामुळे  संजना लामखडे यांची भूमिका नवनागापूर गणासाठी निर्णायक ठरणार आहे. अजय लामखडे यांच्यावर आमदार निलेश लंके यांचा दृढ विश्वास आहे. 

     आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून सरपंच प्रियंका लामखडे यांच्या पाठपुराव्यामुळे गाव विकासासाठी भरीव निधी आणलेला आहे. तसेच गटातील अनेक कार्यकर्त्यांचे कामे आमदार लंके यांच्यामार्फत अजय लामखडे यांनी मार्गी लावलेले आहेत. आमदार निलेश लंके यांचे अत्यंत विश्वासु सहकारी म्हणुन अजय लामखडे यांची राजकारणात ओळख निर्माण झालेली आहे. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता संजना लामखडे यांच्या भूमिकेकडे नवनागापूर गणातील सर्वच नागरिकांचे तसेच  विरोधकांचेही लक्ष लागलेले आहे. संजना लामखडे यांनी या गणातून उमेदवारी केल्यास विरोधकांचीही मोठी अडचण होणार आहे. एकंदरीत संजना लामखडे यांच्या भूमिकेकडे विरोधकांचेही लक्ष लागून राहिलेले आहे. 

________________________________________

'समाजसेवा' हा घराण्याचा वारसा

 संजना लामखडे यांचे पती स्वर्गीय विलासराव लामखडे यांनी सलग दहा वर्ष गावच्या सरपंच पदाची धुरा सांभाळत गावची अविरतपणे सेवा केलेली आहे. तर आज त्यांच्या स्नुषा विद्यमान सरपंच प्रियंका लामखडे या ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावची सेवा करत आहेत. युवा नेते अजय लामखडे अविरतपणे समाजसेवा व नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात व्यस्त असतात. त्यांच्या या समाजसेवेच्या पार्श्वभूमीचा संजना लामखडे यांना निवडणुकीत निश्चितच फायदा होणार आहे यात तिळमात्र शंका नाही. संजना लामखडे यांना नवनागापुर गणातुन निवडणूक सोयीची झाल्याचा कयास राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.

__________________________________________


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post