जेऊर गटात सुनिल पवार यांचीच भुमिका ठरणार निर्णायक ! गटात सर्वाधिक पसंती ; पवार यांची भुमिका गुलदस्त्यात

  माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका - नगर तालुक्यातील जेऊर गटातुन जिल्हा परिषदेची निवडणूक युवा नेते सुनिल पवार यांच्या घरातील उमेदवाराने लढवावी असा आग्रह गटातील अनेक कार्यकर्ते करत आहेत. सुनिल पवार यांच्या कार्यामुळे त्यांना निवडणुकीत कोणतीच अडचण येणार नसल्याची खात्री असल्याने तरुण तसेच जेष्ठ कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता सुनिल पवार यांनी जिल्हा परिषदेसाठी घरातुन उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरत आहेत. परंतु सुनिल पवार यांनी याबाबत मौन बाळगले असुन स्वतःची भूमिका गुलदस्त्यात असल्याने सर्वच राजकीय पक्ष व गटातील ग्रामस्थांचे त्यांच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.

     सुनिल पवार हे सुमारे २५ वर्षांपासून निस्वार्थीपणे समाजसेवा करत आहेत. कुठलेही राजकीय पद, अथवा निवडणूक न लढवता, राजकीय दृष्टीकोन समोर न ठेवता सुनील पवार यांच्याकडून अविरतपणे समाजसेवा सुरू आहे. राजकारणात कोणतेही पद सहज घेऊ शकणारे तसेच गावपातळीवर राजकारणात निवडणूक लढवुन गावातील पदही मिळवु शकत होते. परंतु गावात किंगमेकरची भुमिका नेहमीच सुनिल पवार यांनी बजावलेली आहे. स्वतः सत्तेची, पदाची लालसा न बाळगणारे व मनाचा मोठेपणा दाखवून राजकीय पदे प्रामाणिकपणे नाकारणारे पवार नेहमीच समाजाचा आदर करत समाजसेवेत धन्यता मानताना दिसुन येतात.

     धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात त्यांचे योगदान राहिलेले आहे. जेऊर परिसरात सुनील पवार यांनी केलेली धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मदत संपूर्ण पंचक्रोशीत माहित आहे. सुनील पवार युवा प्रतिष्ठान, संतुकनाथ सेवा मंडळ, श्री साहेबराव चॅरिटेबल ट्रस्ट, राजमुद्रा युवा ग्रुप यांच्या माध्यमातून सुनील पवार हे नेहमीच समाज सेवा करत राहिलेले आहेत.



     एम. ए. बी. एड. शिक्षण झालेले सुनिल पवार आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजसेवेसाठी करताना दिसून येत आहेत. जेऊर गावामध्ये शिवजयंती, बायजामाता दिंडी सोहळा, रक्तदान शिबिर तसेच विविध मंदिरांना आर्थिक मदत, शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे अशा एक ना अनेक समाजसेवेचे उपक्रम सुनील पवार यांच्या माध्यमातून राबविले जात आहेत. गोरगरीब यांना स्वखर्चातून शिक्षण तसेच हॉस्पिटल साठी आर्थिक मदत तरुणांना व्यवसायासाठी आर्थिक मदत याबाबत सुनील पवार यांचा नावलौकिक आहे.

      सुनील पवार यांनी जेऊर गटामध्ये तरुणांची मोठी फळी तयार केलेली आहे. जेऊर गटात प्रत्येक गावात मोठा मित्रपरिवार आहे. सुनील पवार यांची स्वच्छ प्रतिमा तरुणांना मार्गदर्शन, आर्थिक मदत तर ज्येष्ठांचा आदर करत त्यांचे मार्गदर्शन तर महिलांचा सन्मान करणारे नेतृत्व म्हणून सुनील पवार यांच्याकडे पाहिले जाते. जेऊर गटात विरोधकही सुनील पवार यांच्या समाजसेवेच्या कार्याचे कौतुक करत आहेत. धार्मिकतेची ओढ व समाजसेवेचा वसा अंगिकारलेले सुनील पवार यांच्याकडे गटातील अनेक लोक आपल्या समस्या घेऊन येताना आजही दिसून येतात. त्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम सुनील पवार वैयक्तिक अथवा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून तसेच आमदार संग्राम भैय्या जगताप, आमदार अरुणकाका जगताप यांच्याही माध्यमातून करत आहेत.



     सुनील पवार यांच्या कार्याची कौतुक विरोधकांकडूनही केले जात असल्याने त्यांच्या कार्याची प्रचिती दिसून येते. सुनील पवार यांनी निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतल्यास आजही अनेक इच्छुक उमेदवार सुनील पवार यांना आम्ही जाहीर पाठिंबा देऊ आणि निवडणुकीतून माघार घेऊ असे जाहीरपणे सांगत आहेत. सुनील पवार यांचा जेऊर गटाचा गाढा अभ्यास, गटातील समस्या व त्या समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता असल्याने त्यांनी त्यांच्या घरातील उमेदवार देऊन निवडणूक लढवावीच असाच सुर सर्व स्तरांमधून उमटत आहे.

        तालुक्यातील इतर गटात इच्छुक उमेदवार पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात. परंतु सुनिल पवार यांचे एकमेव असे उदाहरण असेल कि पक्षश्रेष्ठी उमेदवारी देत असूनही ती मोठ्या मनाने नाकारणारे सुनील पवार हेच आहे. यापूर्वी देखील त्यांनी पंचायत समिती साठी तसेच जिल्हा परिषदेसाठी देखील मिळत असलेली उमेदवारी नाकारलेली आहे. त्यामुळे आता सुनील पवार यांनी निवडणुकीत उभे राहावेच यासाठी गटातील जेष्ठ कार्यकर्ते तसेच तरुणही सुनील पवार यांची मनधरणी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु सुनील पवार यांनी याबाबत अद्याप तरी मौनच बाळगले आहे. सुनील पवार यांच्या भूमिकेनंतर जेऊर गटातील संपूर्ण चित्र बदलणार आहे. सुनील पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार यात तीळ मात्र शंका नाही. आता प्रतीक्षा आहे ती फक्त सुनील पवार यांच्या निर्णयाची...

______________________________________________

सुनिल पवार यांचे नाव घराघरात

सुनील पवार यांचे राजकारण विरहित समाजकार्य एवढे मोठे आहे की गटामधील प्रत्येक घराघरात त्यांचे नाव समाजकार्याच्या माध्यमातून पोहोचलेले आहे. निस्वार्थपणे कोणतीही लालसा न बाळगता गोरगरीब जनतेला मदत तसेच सर्वच धार्मिक स्थळांना मदत करण्यात सुनील पवार यांचा नेहमीच पुढाकार असतो. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे अत्यंत विश्वासू म्हणून सुनील पवार यांची राजकारणात ओळख आहे. त्यांच्या भूमिकेकडे गटातील सर्व जनता व राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. त्यांच्या भूमिकेनंतर जेऊर गटातील संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

_______________________________________________

       

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post