निवृत्त मुख्याध्यापक सुभाषराव चौधरी यांचे निधन
माय अहमदनगर वेब टीम 

येथील निवृत्त मुख्याध्यापक सुभाषराव पंढरीनाथ चौधरी (वय-75) यांचे गुरुवार 23 जून 2022 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, बहीण, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. स्व. सुभाषराव चौधरी हे माध्यमिक शिक्षक म्हणून सारोळे पठार(संगमनेर), देवळाली प्रवरा(राहुरी), रेसिडेन्सीयल हायस्कुल(अहमदनगर), नारायण डोह(नगर) येथे कार्यरत होते, तसेच टाकळी ढोकेश्वर(पारनेर) येथे मुख्याध्यापक म्हणून नोकरीचा कार्यकाळ पुर्ण केला. गुरुवारी सायंकाळी अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉ. चंद्रसेन चौधरी यांचे वडील व डॉ. हेमलता चौधरी यांचे ते सासरे होते. शनिवार 2 जुलै 2022 रोजी अमरधाम येथे सकाळी 8 वाजता दशक्रिया विधी होणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post