ससेवाडी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी रोहिदास ससे तर व्हाईस चेअरमन पदी नवनाथ ससे यांची निवड

 माय अहमदनगर वेब टीम


नगर तालुका-- नगर तालुक्यातील ससेवाडी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी रोहिदास गुलाबराव ससे तर व्हाईस चेअरमन पदी नवनाथ नानाभाऊ ससे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

      ससेवाडी सेवा संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली होती. महाविकास आघाडीचे ११ उमेदवार विजयी झाले होते. विरोधी गटाला एकही जागा मिळाली नव्हती. येथील दोन जागा त्या प्रवर्गातील उमेदवार मिळत नसल्याने रिक्तच राहत आहेत.

        ससेवाडी सेवा संस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवड मंगळवार दि. १७ मे रोजी करण्यात आली. चेअरमन पदी रोहिदास ससे तर व्हाईस चेअरमन पदी नवनाथ ससे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

     यावेळी डॉ. राजेन्द्र ससे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदार संघाचे तालुकाध्यक्ष रामदास ससे, अशोक ससे, रावसाहेब बहिरु ससे, गंगाधर आठरे, रावसाहेब आसाराम ससे, नवनाथ आठरे, रामदास आठरे, बलभीम मोढवे, देवराम ससे, जगन्नाथ तबाजी ससे यांच्यासह नूतन सोसायटी संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

            चेअरमन पदी रोहिदास ससे, व्हाईस चेअरमन पदी नवनाथ ससे यांची निवड झाल्याबद्दल नामदार प्राजक्त तनपुरे, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post