माय अहमदनगर वेब टीम
कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात बाळ उर्फ बाळासाहेब बोठे याचा नियमित जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी आज फेटाळला. फिर्यादीतर्फे वकील नारायण नरवडे यांनी काम पाहिले.
एका विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात २७ डिसेंबर २०२० रोजी बाळ बोठेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोठे याच्या वतीने नियमित जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील आणि फिर्यादीचे वकील सचिन पटेकर यांनी जामीन देण्यास विरोध दर्शविला. बोठे याच्यावर यापूर्वी दाखल असलेले विविध गुन्हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, असे म्हणणे सादर करण्यात आले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून नियमित जामीन अर्ज फेटाळला होता. बोठेतर्फे औरंगाबाद खंडपीठ अपील करण्यात आले होते. फिर्यादीतर्फे वकील नारायण नरवडे यांनी काम पाहिले.
बोठे याच्याविरुद्ध दाखल असलेला रेखा जरे हत्याकांडातील महत्वाचे पुरावे तसेच मंगल भुजबळ यांनी दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील महत्त्वाचे जाब-जबाब न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते. या विवाहित महिलेला बाळ बोठे वारंवार फोन करीत असल्याचे सीडीआरच्या माध्यमातून निर्दशनास आणून देण्यात आले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून बोठे याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
Post a Comment