नागवडे कारखान्यांसाठी रेकॉर्ड बेक्र अर्ज दाखल

 


श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda


नागवडे कारखान्यांच्या निवडणूक (Election of Nagwade Factories) कार्यक्रम सुरू झाल्यापासून शुक्रवारपर्यंत 21 जागांसाठी तब्बल 306 अर्ज दाखल (Application Filed) झाले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बाबासाहेब भोस, केशवराव मगर, भगवानराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार, प्रतिभा पाचपुते या बड्या नेत्यांनी अर्ज दाखल केले.


नागवडे कारखाना निवडणूक कार्यक्रम जाहीर (Nagwade Factory Election Program Announced) झाल्यापासून राजेंद्र नागवडे, केशवराव मगर व आ. बबनराव पाचपुते या तिन्ही नेत्यांचे तीन पॅनल आपापसात लढणार असल्याचे वरकरणी दिसत होते. आ. पाचपुते (MLA Pachpute) यांनी निवडणूक लढण्याची भीमगर्जना केली होती. तर राजेंद्र नागवडे (Rajendra Nagwade), आ. पाचपुते (MLA Pachpute) यांच्याकडून विधानसभेला मदत केल्याची परतफेड करावीच लागेल असा आत्मविश्वास बाळगून होते. परंतु पाचपुते यांची नागवडे यांच्याबरोबर साथ देण्याची इच्छा असूनही कार्यकर्त्यांच्या रोषापाई मगर यांच्याशी जुळवून घ्यावे लागले.


तालुक्यात पाचपुते यांना मानणारा मोठा सभासद वर्ग आहे. सर्वसाधारण गटात उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे काष्टी 26, कोळगाव 29, बेलवंडी 43, टाकळी कडेवळीत 35, लिंपणगाव 47 असे एकूण 205 अर्ज दाखल झाले. सेवा संस्था प्रतिनिधी गटात 8, महिला प्रतिनिधी 38, इतर मागास प्रवर्ग 25, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी गटात 12 व भटक्या विमुक्त जाती जमाती गटात 16 अर्ज दाखल झाले. एकूण 508 अर्जांची विक्री झाली होती परंतु अंतिम 304 अर्जच दाखल झाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post