राष्ट्रवादीचे 'मिशन विदर्भ'; शरद पवार चार दिवस विदर्भ दौऱ्यावर



मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे बुधवार, १७ नोव्हेंबरपासून चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. बरोबर दोन वर्षांनी त्यांचा हा दौरा होत असून यावेळी मेळाव्यामुळे नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे.

पवार यांचे बुधवारी दुपारी १ वाजता आगमन झाल्यानंतर व्यापारी प्रतिनिधींसोबत बैठक व सायंकाळी ५ वाजता पूर्व नागपुरात मेळावा होणार आहे. गुरुवारी सकाळी ८.३० वाजता ते वडसा देसाईगंजला रवाना होतील. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपस्थित राहतील. यानंतर माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे प्रमुख पदाधिकारी व शिष्टमंडळाशी चर्चा आहे. सायंकाळी ५.३० वाजता मुल येथे मेळाव्यानंतर चंद्रपूर येथे मुक्काम आहे.

शरद पवार शुक्रवारी सकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील डॉक्टर, वकील व व्यापाऱ्यांसोबत चर्चा करतील. यानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक, ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. सायंकाळी यवतमाळ येथे संदीप बाजोरीया यांच्याकडे कार्यकर्ते व शिष्टमंडळाच्या भेटी घेतील. शनिवारी ते वसंतराव घुईखेडकर यांच्याकडे भेट दिल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. दुपारी वर्धेत आगमन झाल्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकारी व शिष्टमंडळाशी भेट घेतल्यानंतर रात्री ते मुंबईला रवाना होतील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post