धक्कादायक... पोलीसच कापूस व्यापार्‍याच्या खूनाचा मास्टरमाईंड

 


जळगाव | हवाल्याचे पैसे घेवून जाणार्‍या कापूस व्यापार्‍याचा पाळधीजवळ लुटीच्या प्रयत्नात खून (murder)झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ७२ तासातच उलगडा केला असून सोमवारी पाच संशयितांना अटक (arrested)केली आहे. पाच संशयितांपैकी मुख्य संशयित जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी असून तोच मास्टरमाईंड असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती सोमवार, २९ नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे (pravin munde)यांनी दिली आहे. तसेच तपासाच्या दृष्टीने तसेच ओळख परेड बाकी असल्याने संशयितांची नावे जाहीर करण्यात आली नाही.

मालेगावातील घटनेने सलमान खान नाराज, म्हणाला...

एरंडोल तालुक्यातील फरकांड येथील धनदाई ट्रेडर्सचे संचालक कापूस व्यापारी स्वप्निल रत्नाकर शिंपी हे चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.०१ ए.एल.७१२७ ने दिलीप राजेंद्र चौधरी यांना सोबत घेत जळगावातील हवाल्याच्या कार्यालयात आले होते. याठिकाणाहून दोन व्यापार्‍यांकडून दिलीप चौधरी यांनी १५ लाखांची रोकड घेतली. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रोकड घेवून चारचाकीने जात असतांना पाळधीजवळ दोन दुचाकींवरुन आलेल्या चौघांनी स्वप्निल शिंपी यांच्या चारचाकीसमोर दुचाकी आडव्या लावून कार अडविली. यानंतर स्वप्निल शिंपी यांना शिवीगाळ करत संशयितांपैकी एकाने गाडीचा दरवाजा उघडला तर दुसर्‍या चालक शिंपी यांच्या पाठीत चाकू भोसकून त्यांचा खून केला. यानंतर शिंपी याच्याकडील रोकड घेवून संशयित पसार झाले. नेमके संशयितांनी किती रोकड लांबविली हे समोर आलेले नाही. मात्र १५ लाखांपैकी काही रक्कम सुरक्षित घटनास्थळी मिळून आली. याप्रकरणी शिंपी यांच्या सोबत असलेल्या दिलीप चौधरी यांच्यामुळे ही घटना समोर आली होती. दिलीप चौधरी यांच्या फिर्यादीवरुन धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post