जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या मागे र्ईडी लागणार : विखे पाटील

श्रीरामपूर | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) मंत्री व दलालांचे साटेलोटे दररोज समोर येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar DistricT) एक मोठा मंत्रीही भ्रष्टाचारात (Corruption) अडकला आहे. कुणी किती ‘महसूल’ (Revenue) गोळा केला हे ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी लोकांच्या लक्षात येईल, असा गौप्यस्फोट आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी केला. त्यामुळे हा अंगुलीनिर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू होती.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त (Amrit Mahotsavi Varsha) राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत श्रीरामपूर येथे 60 वर्षांवरील नागरिकांसाठी वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आ. राधाकृष्ण विखे पा. (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

महसूल मंत्री थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी संगमनेर (Sangamner) येथे एका कार्यक्रमात आ. विखे पा. (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांचे नाव न घेता आरोप केले होते. याबाबत पत्रकारांनी विचारले असता विखे (MLA Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, त्यांना व काँग्रेसला (Congress) राज्य सरकारमध्ये किती किंमत आहे, हे लोकांनी पाहिले आहे. त्यामुळे ज्यांना पक्षात व सरकारमध्ये किंमत नाही त्यांच्या वक्तव्याबद्दल मी काय बोलणार?

राज्यातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) भ्रष्टाचाराला लोक कंटाळलेले असून मंत्री व दलालांचे साटेलोटे रोज समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar DistricT) एक मोठा मंत्री त्यात अडकला आहे. त्यांचे प्रकरण ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी लोकांच्या लक्षात येईल. याबाबत चौकशी सुरू आहे. वास्तविक पाहता आपली पापे झाकण्यासाठी स्वायत्त संस्था असलेल्या ईडी (ED), सीबीआय (CBI) सारख्या संस्थांवर दोषारोप चालू आहे. कारण या संस्था बदनाम करायच्या म्हणजे आपला भ्रष्टाचार लपविता येईल, या भ्रमात मंत्र्यांनी राहू नये. असा माझा त्यांना सल्ला असल्याचे ते म्हणाले.


मंत्री हा नवा आहे की जुना असे पत्रकारांनी विचारले असता, सध्या या प्रकरणावर सबुरीने घ्या, म्हणजे लवकरच मंत्री नवीन आहे की जुने हे कळेल. कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल, असे त्यांनी सूचित केले.

जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या असून भाजपने सर्व नगरपालिकांच्या निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीरामपूर नगरपालिकाही आम्ही पूर्ण ताकदीने लढविणार आहोत, असेही आ. विखे पा. (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post