‘भविष्यातही कोरोना महामारीपासून सुटका नाहीच’; गगनदीप कांग यांचं मोठं वक्तव्य

 


नवी दिल्ली | कोरोनानं जगभरात आपले हातपाय पसरवले आहेत. संपूर्ण जगाला या व्हायरसनं हैराण करुन सोडलं आहे. त्यातच आता कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटनं तर चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे. अशातच अभ्यासातून दिवसागणिक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

पुढील भविष्यात देश कोरोना महामारीपासून मुक्त होणार नाही. कोरोना महामारी ही कायम राहील. स्थानिक पातळीवर जर कोरोना संसर्ग असाच वाढत राहिला तर ही लाट कोरोनाचं तिसरं रुपही धारण करण्याची शक्यता आहे. मात्र या लाटेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेएवढी परिस्थिती गंभीर होणार नाही, असं देशातील व्हायराॅलाॅजिस्ट डाॅ. गगनदीप कांग याचं म्हणणं आहे.

प्रिटर या वृत्तसंस्थेची बोलताना डाॅ. गगनदीप यांनी म्हटलं की, कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर देशाच्या एक तृतीयांश लोकसंख्येला संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे काही भागांमध्ये संसर्ग वाढत जाऊ शकतो.

दरम्यान, सणासुदीच्या काळात गर्दीमुळे कोरोना संसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट लवकरच येऊ शकते. नागरिकांनीही लसीकरण लवकरात लवकर करण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post