‘या’ कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; भारतातील फ्रेशर्ससाठी भरतीची घोषणा मुंबई | कोरोना महामारीच्या काळात काही कंपन्यांना मोठ्या नुकसानास सामोरं जावं लागलं असलं तरी देखील काही कंपन्यांनी या काळात मोठा फायदा कमावला आहे. कोरोना महामारीचा काळ आयटी कंपन्यांसाठी चांगलाच फायद्याचा ठरला आहे. महामारीच्या काळात फायद्यात राहिलेल्या कंपन्यांपैकी एक म्हणजे International Business Machines ही एक आहे.

IBM ही जगभरात नावाजलेली कंपनी आहे. IBM कंपनीने आता भारतातील फ्रेशर्ससाठी भरतीची घोषणा केली आहे. असोसिएट सिस्टिम इंजिनिअर या पदासाठी IBM मध्ये भरती घेण्यात येणार आहे. यासाठी उमेद्वारांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रॅमिंग, Java, Python, Node.js याचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

अहमदाबाद, बंगलोर, कोलकत्ता, चेन्नई, नोएडा, हैदराबाद, गुडगाव, दिल्ली, पुणे, मुंबई या शहरांमध्ये ही भरती होणार आहे. देशभरातील उमेद्वार यासाठी अर्ज करु शकणार आहेत.

दरम्यान, उमेद्वारी अर्ज दाखल करण्यासाठी IBMच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची माहिती घेता येईल. असोसिएट सिस्टिम इंजिनिअर ही पोस्ट फक्त फ्रेशर्ससाठी असल्याने उमेद्वार BE, MTech, MSc, MCA in CS आणि IT च्या फायनल ईयरला असणं आवश्यक आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post