पाणलोटात श्रावणसरींचे आगमन, मुसळधार पावसाची गरज, गोदावरीत 606 क्युसेकने पाणी

 


अस्तगाव |दारणा (Darna), गंगापूरच्या पाणलोटात (Watershed of Gangapur) हलक्या श्रावणसरींचे आगमन होत आहे. या सरींनी मात्र धरणात पाण्याची आवक (Dam Water Inward) होत नसल्याने धरणांच्या पाणलोटाला मुसळधार (Rain) पावसाची गरज आहे. ओढ्या नाल्यातून नांदूरमधमेश्वर (Nandurmadhameshwar) बंधार्‍यात पाणी दाखल होत असल्याने या बंधार्‍यातून गोदावरीत (Godavari) 606 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

सह्याद्रीचा घाट माथा तसेच इतर धरणांचे पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने नवीन पाण्याची आवक नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हलक्या श्रावणसरी सुरू आहेत. या सरींमुळे नवीन पाण्याची आवक धरणात (New Water Dam Inward) होत नाही. मुसळधार पावसाचे आगमन होत नसल्याने चिंतेत वाढ होत आहे. धरणांची स्थिती फारशी समाधानकारक नाही. दारणा (Darna), गंगापूर (Gangapur) या दोन्ही धरणांचा साठा (Dam Water Storage) 80 टक्क्यांवर आहे. दारणातून 20 ते 25 टीएमसीचा विसर्ग दरवर्षी होत असतो. यावर्षी या धरणातून आतापर्यंत सव्वा तीन टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे.

गंगापूरमधून (gangapur) अर्धा टीएमसी पेक्षा कमी झाला. तर या समुहातील पाणी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात येऊन तेथून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने काल अखेरपर्यंत 4.6 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. काल सायंकाळीही या बंधार्‍यातून 606 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. काल हा विसर्ग 404 क्युसेक इतका होता. काल दुपारी 12 वाजता तो वाढवून 606 करण्यात आला. नाशिक (Nashik District) जिल्ह्यातील धरणांमध्ये कालच्या तारखेला मागील वर्षी 67.85 टक्के पाणीसाठा होता. तर काल 63.92 टक्के आहे.

धरणांच्या पाणलोटात जोरदार पावसाची वाट जलसंपदा आणि लाभक्षेत्रातील शेतकरी पाहत आहे. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील पिकांना दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मुसळधार पाऊस नसल्याने लाभक्षेत्रालाही चिंता आहे. खरीप आवर्तन जलसंपदाने सोडवेच, असा शेतकर्‍यांचा आग्रह आहे.

काल सकाळी 6 वाजता मागील संपलेल्या 24 तासांत धरणांच्या पाणलोटात व गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील पाऊस असा- पाऊस मिमीमध्ये- दारणा 9, मुकणे 16, वाकी 16, भावली 21, वालदेवी 7, गंगापूर 20, कश्यपी 9, गौतमी गोदावरी 4, कडवा 7, आळंदी 10, इगतपुरी 7, अंबोली 6, देवगाव 22, ब्राम्हणगाव 26, कोपरगाव 29, पढेगाव 55, सोमठाणा 14, कोळगाव 28, सोनेवाडी 9, शिर्डी 15, राहाता 13, रांजणगाव 13, चितळी 18 असा पाऊस नोंदला गेला.

धरणातील साठे- दारणा 80.95 टक्के, मुकणे 57.18 टक्के, वाकी 47.95 टक्के, भाम 96.71 टक्के, भावली 100 टक्के, वालदेवी 100 टक्के, गंगापूर 80.18 टक्के, कश्यपी 56.32 टक्के, गौतमी गोदावरी 66.76 टक्के, कडवा 80.69 टक्के, आळंदी 95.25 टक्के.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post