अखेर ठरलं... तारखेला होणार झेडपी कर्मचार्‍यांच्या बदल्या

 


माय वेब टीम 

संगमनेर | राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या (State Rural Development Department) वतीने जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याचे आदेश (Order for transfer of Zilla Parishad employees) दिले आहेत. त्यानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेने शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या वगळता क व ड श्रेणीतील बदली पात्र कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेसाठी वेळापत्रक जाहीर (Announce the schedule for the transfer process) केले आहे.

या वर्षी मे महिन्यात होणार्‍या बदल्या करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्याची कार्यवाही होण्याच्या दृष्टिने जिल्हा परिषद (Zilla Parishad) कर्मचार्‍यांच्या प्रत्येक संवर्गासाठी सेवा ज्येष्ठता सूची तयार करण्याच्या सूचना प्रशासनाच्यावतीने यापूर्वीच देण्यात आल्या होत्या.सर्वसाधारण बदल्यांचे धोरण व मार्गदर्शक सूचना व बदल्यांसाठीचे वेळापत्रक निश्चित करून देण्यात आले आहे. जिल्हा परिषद अंतर्गत सर्व संवर्गाच्या सेवाज्येष्ठता सूची जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आली आहे.

तात्पुरत्या सेवाज्येष्ठता सुचीवरील प्राप्त हरकती दिनांक 06 मे 2021 पर्यंत संवर्गनिहाय खातेप्रमुखांकडे सादर करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. प्राप्त हरकतींची नियमानुसार पडताळणी करून अंतिम सेवाज्येष्ठता सूची जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर 6 मे 2021 रोजी प्रसिद्ध केली आहे. प्रक्रिया ही दिनांक 31 जुलै 2021 अखेर पूर्ण करावयाची आहे.

त्यानुसार सर्व विभागांचे समुपदेशनासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. दिनांक 20 जुलै रोजी 10 ते 1 प्रशासन विभाग, 2 ते 4 अर्थ विभाग, चार ते सहा कृषी विभाग. 21 जुलै रोजी दहा ते दोन महिला व बालकल्याण विभाग तीन ते सहा पशुसंवर्धन विभाग. 22 जुलै रोजी 10 ते 11 लघु पाटबंधारे,11 ते 1 पाणीपुरवठा, तीन ते सहा बांधकाम विभाग.24 रोजी सकाळी 10 ते 1 शिक्षण विभाग दुपारी दोन ते सहा आरोग्य विभाग ,25 जुलै रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा आरोग्य विभाग.26 जुलै रोजी ग्रामपंचायत विभाग अशा पद्धतीने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.कोविड 19 रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून समुपदेशन हॉलमध्ये बदलीपात्र कर्मचार्‍यांनीच हजर रहायचे आहे. प्रशासकिय व विनंती बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचार्‍यांनी शासन निर्णयामधील बदली धोरणानुसार सूट मिळणे करीता विनंती केली असल्यास आवश्यक कागदपत्रांची खातरजमा संबंधित खातेप्रमुखांनी काटेकोरपणे करायची आहे. बदल्यांसाठी विनती / आपसी 14/07/2029 पर्यंत प्राप्त संबंधित खातेप्रमुख अधिकारी यांनी यावेत व संबंधित खातेप्रमुखांकडे सादर करावेत.

शासन निर्णय 15 मे 2014 नुसार मुख्यालयातील व तालुक्यातील रिक्त पदे भरतांना पदांचा समतोल राखणे तसेच आदिवासी दुर्गम भागातील पदे प्राधान्याने भरावीत . तदनंतर तालुका निहाय पदांचा समतोल राखणे .अपंग कर्मचारी यांनी ज्या प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र मिळवले आहे योग्य व ऑनलाईन प्रमाणपत्र असलेबाबतची पडताळणी करणेची जबाबदारी खातेप्रमुखांची असणार. बदलीप्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता झाल्यास त्यास संबंधित खातेप्रमुख / गटविकास अधिकारी व्यक्तीश जबाबदार धरणेत येईल याची गांभिर्याने नोंद घेवून बदली प्रक्रिया संपल्यानंतर तात्काळ इतिवृत्त व बदली आदेश त्याचदिवशी माझ्या स्वाक्षरीसाठी सादर करावेत. तसेच तालुका स्तरावरील बदल्या दिनांक 28 जुलै 2011 ते 29 जुलै 2015 रोजी करण्यात याव्यात असे आदेश देण्यात आले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post