जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज पाठवा :जिल्हा परिषदेकडून शिक्षकांना आवाहनमाय वेब टीम 

 संगमनेर |  अहमदनगर जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणार्‍या जिल्हा शिक्षक, केंद्रप्रमुख पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी जिल्हा शिक्षक व केंद्रप्रमुख पुरस्कार देण्यात येतो. 5 सप्टेंबर 2021 साठी पात्र शिक्षकांना व केंद्रप्रमुखांचे प्रस्ताव दिलेल्या विहित नमुन्यात पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या शिक्षकांना व केंद्रप्रमुखांना या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी भाग घ्यावयाचा असेल त्या शिक्षकाने व केंद्रप्रमुखाने संकेतस्थळावरती देण्यात आलेली प्रश्नावली भरून गटशिक्षणाधिकारी कार्यालयात 22 जुलै पर्यंत जमा करावयाची आहे. त्याचे गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांनी पडताळणी करून ज्या शिक्षकांना जास्त गुण पडतील अशा तीन शिक्षकांचे व एक केंद्रपुमुखांचे प्रस्ताव 28 जुलैपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

हे आहेत निकष-

31 मे पर्यंत मुख्याध्यापकांची सलग सेवा किमान 20 वर्ष. उपशिक्षकाची सलग सेवा किमान 15 वर्ष असावी लागेल. जे शिक्षक प्रतिनियुक्तीवर आहेत व नियमित वर्गअध्यापन करत नसतील अशा शिक्षकांना प्रस्ताव सादर करता येणार नाही. शिक्षकांचे शैक्षणिक कार्य राष्ट्रीय कार्य, सामाजिक कार्य, शैक्षणिक पात्रता, उपक्रम, विद्यार्थ्याची तयारी, गुन्हा दाखल झालेले आणि विभागीय चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित असू नये. प्रस्तावप्राप्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांचे मा. पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचेकडून प्राप्त वर्तवणुकी बाबतचे दाखले प्रस्तावासोबत पाठवावे लागणार आहे.

तालुक्यातून तीन प्रस्ताव-

प्रत्येक तालुक्यातुन जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी तीन शिक्षकांचे प्रस्ताव पाठवावे लागणार आहे. त्यामध्ये किमान एक महिला शिक्षिकाचा समावेश असावा. केंद्रप्रमुख पुरस्कारासाठी एक प्रस्ताव पाठवावा. प्रस्ताव पाठविण्यापूर्वी त्यातील माहिती प्रमाणपत्रे इत्यादी पडताळून पाहावित. अधिक गुण मिळविणारे गुणानुक्रमे तीन शिक्षकांचे व एक केंद्रप्रमुख यांचे प्रस्ताव जिल्ह्यात पाठविण्यात यावेत. एकच प्रस्ताव पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, मा. सभापती पंचायत समिती यांचे स्वाक्षरीने पाठवावेत असेही आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे.

असे असेल गुणदान-

अहमदनगर जिल्हा परिषद च्या वतीने पुरस्कारासाठी प्रश्नावली विकसित करण्यात आली असून त्यात दहा मार्क शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ठेवण्यात आली आहे. सतरा मार्क वैयक्तिक गुणदानासाठी साठी, राष्ट्रीय व सामाजिक कार्यासाठी 14 मार्क, सहशालेय उपक्रमासाठी नऊ मार्क, वर्ग अभिलेख यासाठी चार मार्क, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आपणासाठी पाच मार्क, विविध स्पर्धा परीक्षा सात मार्क, शिष्यवृत्ती परीक्षा चार मार्क, लॉक डाऊन काळातील शिक्षकांनी केलेले विविध प्रयत्न यासाठी सोळा मार्क व गोपनीय अभिलेखांसाठी दहा मार्क राखीव ठेवण्यात आले आहे. असे एकूण 100 गुणाला शिक्षकांना सामोरे जावे लागणार नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post