धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर नाही, पाणीसाठा वाढेना


माय वेब टीम 

 अहमदनगर | राज्याच्या विविध भागात धो-धो पाऊस कोसळत असताना, दुसरीकडे नगर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात (Nagar district dam watershed) तसेच नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या अन्य जिल्ह्यांतील धरणांच्या पाणलोटात (watershed) पावसाने (Rain) दडी मारल्याने चिंता व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसांत या पाणलोटात वरूणराजाने मेहरबानी न केल्यास मोठे संकट उभे राहण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा-निळवंडे (Bhandardara-Nilwande), मुळा (Mula) आणि दारणा (Darna), गंगापूर (Gangapur) तसेच दक्षिण नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील धरण पाणलोट (Kukdi project dam watershed) क्षेत्रात पावसाची केवळ रिमझीम सुरू आहे.त्यामुळे सर्वच धरणात नवीन पाण्याची आवक फारशी झालेली नाही. भंडारदरा (Bhandardara) आणि मुळा धरणात (Mula Dam)

गतवर्षीचा साठा मुबलक होता. त्यामुळे अजूनही या धरणात बर्‍यापैकी पाणीसाठा आहे. पण दारणा, गंगापूरमध्ये कमी पाणीसाठा आहे. तसेच कुकडीतील पाचही धरणात आज मितीस केवळ 17.82 टक्के पाणीसाठा आहे.

नगर जिल्ह्यातील लाभक्षेत्रात सर्वदूर पाऊस सुरू असल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. पण पाणलोटात अद्यापही पावसाने जोर न धरल्याने भाताची आवणी लांबणीवर पडली आहे. भंडारदरा आणि कोतूळ वार्ताहराने कळविले की, गुरूवारी या धरणाच्या पाणलोटात रिमझीम सुरू होती. त्यामुळे शेतकरी काळजीत पडला आहे. भंडारदरा वार्ताहराने कळविलेल्या माहितीनुसार, पावसाळी वातावरण टिकून आहे. पण पाऊस जोरदार बससत नाही.

धरणातील पाणीसाठ्यावरच रब्बीची पेरणी अवलंबून असते. पण अद्यापही धरण पाणलोटात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणात अत्यल्प नव्याने पाण्याची आवक झाली. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात 4608 दलघफू तर 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात (Mula Dam) 9628 दलघफू पाणीसाठा आहे. 8320 दलघफू क्षमतेच्या निळवंडेत (Nilwande) केवळ 1203 दलघफू पाणीसाठा आहे.

आढळात 463 दलघफू पाणीसाठा आहे. गतवर्षी पाणलोटात मुबलक पाऊस झाल्याने ही धरणं तुंडूब झाली होती. त्यामुळे यंदा या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा शिल्लक होता. पण यंदा अजूनही जोरदार पाऊस न बरसल्याने फारसे नवीन पाणी आलेले नाही. जर गतवर्षीचा साठा नसतातर आता मोठे संकट नगरकरांवरआले असते.

गंगापूर धरणात (Gangapur Dam) 33 तर दारणात (Darna) 45 टक्के पाणीसाठा आहे. धरण पाणलोटातही पाऊस नसल्याने गोदावरीत (Godavari) यंदा फारसे पाणी नाही. घोड धरणात (Ghod Dam) 25.88 टक्के पाणीसाठा आहे. नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जतला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पाची बिकट अवस्था आहे. येडगाव धरणात आजमितीस 45.53 टक्के पाणीसाठा आहे.

माणिकडोहध्ये (Manik doh) केवळ 10.53 टक्के पाणीसाठा शिल्लक (Water Storage) आहे.वडजध्ये 36.09 पाणीसाठा आहे. पिंपळगाव जोगात तर उणे 59.41 टक्के पाणी आहे. डिंभे (Dimbhe Dam ) सर्वात मोठे धरण. त्यातही केवळ 23 टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पात एकूण 17.82 टक्के एवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकर्‍यांत चिंतेचे वातावरण आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post