Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ सुरूच, जाणून घ्या आजचा दर


माय नगर वेब टीम 

 दिल्ली - देशात एकीकडे करोनाचा (Corona) प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात इंधनाची दरवाढ होत आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोलने (Petrol) शंभरी ओलांडली आहे. तर डिझेलही त्याच मार्गावर वाटचाल करत आहे. (Petrol, diesel prices today on June 29)

आज पुन्हा एकदा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याचं दिसून आलं आहे. आज (२९ जून) पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये जून महिन्यातील १६ वी दरवाढ नोंदवण्यात आली. आज पेट्रोल प्रतिलिटर ३५ पैसे तर डिझेल प्रतिलिटर २८ पैशांनी महागले आहे.

दिल्लीमध्ये (Delhi) पेट्रोल ९८.८१ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८९.१८ रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. तर मुंबईमध्ये (Mumbai) पेट्रोलचे दर १०४.९० रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९६.७२ रुपये प्रति लीटर इतके आहेत. कोलकाता (Kolkata) मध्ये पेट्रोल ९८.६४ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९२.०३ रुपये प्रति मिळत आहे. चेन्नईमध्ये (Chennai) पेट्रोलची किंमत ९९.८२ रुपये प्रति लीटर आणि डिझेलची किंमत ९३.७४ रुपये प्रति लीटर इतकी आहे.

तसेच पुण्यामध्ये (Pune) पेट्रोल १०४.४८ रुपये प्रति लीटर तर डिझेल ९४.८३ रुपये प्रति लीटर लिटरने विकले जात आहे. तर नागपूरमध्ये (Nagpur) पेट्रोल १०४.३४ रुपये प्रति लीटर व डिझेल ९४.७५ रुपये प्रति लीटर. नाशिकमध्ये (Nashik) पेट्रोल १०५.२४ रुपये प्रति लीटर तर डिझेल ९५.५६ रुपये प्रति लीटर. औरंगाबादमध्ये (Aurangabaad) पेट्रोल १०६.१४ रुपये प्रति लीटर तर डिझेल ९७.९६ रुपये प्रति लीटर. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) पेट्रोल १०५.०० रुपये प्रति लीटर तर डिझेल ९५.३५ रुपये प्रति लीटर. अहमदनगरमध्ये (Ahmednagar) पेट्रोल १०३.३१ रुपये प्रति लीटर तर डिझेल ९६.६४ रुपये प्रति लीटर.

पश्चिम बंगालसह (West Begal) पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर ४ मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढायला सुरुवात झाली होती. गेल्या ३३ दिवसांत पेट्रोल तब्बल ८.४० आणि डिझेल ८.४७ रुपयांनी महागले आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post