नैराश्येपोटी देशमुखांवर कारवाई : शरद पवार



माय वेब टीम 

 पुणे - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानांवर ईडीनं टाकलेल्या छाप्यांवर, केंद्रीय यंत्रणांना आलेल्या नैराश्यातून ही कारवाई सुरू असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

सुबोध मोहिते यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. “ईडी वगैरे आम्हाला काही नवीन नाहीत. अनिल देशमुख काही पहिले नाहीत. अनेकदा सत्तेचा या पद्धतीने वापर करण्याचा पायंडा आताच्या राज्यकर्त्यांनी दाखवला आहे. त्याची आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नाही. देशमुखांवर केंद्र सरकारच्या काही यंत्रणांनी याआधीही कारवाई केली होती. माझ्या मते काहीही हाती लागलं नाही. त्या नैराश्यातूनच अजून कुठून त्रास देता येईल का? या विचारातून हा त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. त्याची चिंता करण्याचं काही कारण नाही”, असं पवार म्हणाले आहेत.

“जो विचार आपल्याला मान्य नाही तो विचार दडपण्याचा प्रयत्न या प्रकारच्या यंत्रणा वापरून केला जातो. हे काही नवीन नाही. केंद्राची सत्ता यांच्या हातात आल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी पाहायला लागलो. याचा काहीही परिणाम होणार नाही. लोक देखील त्याची गांभीर्याने नोंद घेत नाहीत”, असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post