दक्षिणेचे राजकारण सोशल मिडीयावर...माय वेब टीम 

अहमदनगर - कुठे दाढी केली, कोठे भेट दिली की त्याचे फोटो सोशल मिडीयावर फोटो (Social Media Photo) टाकले जातात. दक्षिण नगर जिल्ह्यात सोशल मिडीयावर (South Nagar District Social Media) कसे राजकारण (Polities)चालते, मला माहिती आहे. परंतु, लोकप्रतिनिधी विकासकामे करण्यासाठी असतो, फोटो काढून सोशल मिडीयावर टाकण्यासाठी नसतो, असा टोला खा. डॉ. सुजय विखे (MP dr. Sujay Vikhe) यांनी दक्षिणेतील राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार (MLA Rohit Pawar) आणि आ. नीलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांचे नाव न घेता लगावला.

नगर महापालिकेतील (Municipal Corporation) भाजप- राष्ट्रवादी युतीला (BJP-NCP) अडीच वर्षे पूर्ण झाली. यासंदर्भात गेल्या अडीच वर्षांमध्ये शहरात कोणकोणती विकासकामे झाली. याचा आढावा डॉ. विखे (Dr. Vikhe) यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधीसमोर मांडला. यावेळी ते बोलत होते.

डॉ. विखे म्हणाले, नगर दक्षिणेत भाजपचा खासदार (BJP MP) म्हणून निवडणूक लढविली. केली हो नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासावर खासदार म्हणून निवडूण आलो. विकासकामे करण्यावर भर दिला आहे. परंतु, नगर दक्षिणेत विकासकामे कमी आणि सोशल मिडीयावर फोटो सेशन जास्त चालते. याचा अनुभव मला आला आहे. कोणी कुठे दाढी केली, भेटी दिल्या तरी त्याचे फोटो सोशल मिडीयावर (Photo Social Media) टाकले जातात.

 लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून कामे करण्यासाठी निवडून दिले असते. सोशल मिडीयावर फोटो टाकण्यासाठी नाही. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर विकासकामे करण्यावर भर दिला पाहिजे. मात्र, दक्षिणेत वेगळेच चित्र पाहिला मिळत आहे. याचा मी चांगला अभ्यास केला असल्याचे डॉ. विखे म्हणाले. सोशल मीडियाच्या माध्यातून आ. पवार आणि आ. लंके आता खा.डॉ. विखे यांच्या टीकेला कसे उत्तर देता याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post