नगरचा महापौर शिवसेनेचाच : विखे म्हणतात, सत्कार होईपर्यंत खरं नाही

 


माय वेब टीम 

अहमदनगर - नगर महापालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) महापौर (Mayor) पदासाठी 30 जुनला होणार्‍या निवडणुकीचा (Election) तर्क-वितर्कावर राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप (NCP MLA Sangram Jagtap) यांनी पडदा टाकला. मुंबईच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार महापौर शिवसेनेचाच (Shivsena Mayor) होणार असल्याचे त्यांनी रविवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. अडीच वर्षासाठी नगरमध्ये महाविकास आघाडी सत्तेत येणार असल्याचे सांगताना पद वाटपाचे सूत्र अजून ठरले नसल्याचे ते म्हणाले.

महापौर पद (Mayor Post) हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. 30 तारखेला त्याची निवडणूक (Election) होत आहे. स्थानिक पातळीवरील राजकीय विरोधक असलेले शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येतात की नाही याची उत्सुकता होती. मात्र, गत आठवड्यात मुंबईत दोघांनी एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले. शिवसेनेचा महापौर (Shivsena Mayor) करण्याचा निर्णय झाला आहे. अन्य पद वाटपाची सूत्रे ठरलेले नाहीत. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनाही (NCP Corporators) ते मान्य केले आहे. महापौर पदाचा फॉर्म्युला सव्वा -सव्वा वर्षाचे असेल का? यावर बोलताना त्यांनी तो निर्णय मुंबईत वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असल्याचे सांगितले.

कॉँग्रेस हा महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. सत्तेत ते सोबत असतील, पद वाटपात काय तो निर्णय होईल. नगरसेवकांची एकत्रित बैठक झाल्यानंतर उपमहापौर पदासह इतर पदांचा निर्णय घेतला जाणार आहे. स्थानिक पातळीवर सर्व नगरसेवक एकत्र बसून निर्णय घेतील. यापुढे महापालिकेच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र असणार असल्याचे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले.


विखे म्हणतात, सत्कार होईपर्यंत खरं नाही

नगर शहराच्या राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, हे नेहमीचे वाक्य आजही भाजप खासदार विखे यांनी वापरले. भाजपकडे राखीव पदाचा उमेदवार नसल्याने भाजपची भूमिका काय? यावर त्यांनी विरोधकाचे हे उत्तर दिले, पण महापौर पदासाठी प्रत्यक्ष मतदान झाले तर काय? यावर मात्र त्यांनी तो निर्णय ऐनवेळी घेऊ. कोणतीही निवडणूक असली तरी कधी काय होईल हे सांगता येत नाही.त्यामुळेच ठरलं तसं होत, असं नाही. सत्कार होईपर्यंत महापौर कोण? हे कळणार नाही असे सांगत महापौर पदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स निर्माण केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post