पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वेसाठी जमीन खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी


माय वेब टीम 

संगमनेर - पुणे-संगमनेर-नाशिक दरम्यान नवीन दुहेरी मध्यम उच्च वेगवान ब्रॉडगेज लाईनच्या विद्युतीकरणासह बांधकामाकरिता जमीन खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याची प्रक्रिया संगमनेर तालुक्यात सुरू झाली आहे. भूसंपादन करण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, महारेलचे अप्पर महाव्यवस्थापक सचिन कुलकर्णी यांच्या नावाने संबंधित गावातील शेतकर्‍यांना नोटिसा जारी केल्या आहेत.

पुणे-संगमनेर-नाशिक हा 235 किलोमीटरचा रेल्वे मार्ग असणार असून हा रेल्वे मार्ग पुणे, नगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधून जात आहे. जवळपास तासी 180 किलोमीटर रेल्वेचा वेग राहणार आहे विशेष म्हणजे अठरा बोगदे असणार आहेत.

त्यात संगमनेर तालुक्यातील केळेवाडी, माळवाडी, बोटा ,ऐलखोपवाडी , खंदरमाळवाडी, नांदूर खंदमाळ, जांबुत, साकूर, जांभुळवाडी, पिंपळगाव देपा, कोळवाडे, पिंपारणे, जाखुरी, खराडी, जोर्वे, कोल्हेवाडी, समनापूर पोखरी आदी गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये जमिनीची मोजणी झाली असून त्या त्या गावांतील प्रस्तावित क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. आता या गावांतील ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी या प्रकल्पात जात आहेत.

त्यांना नोटीसा पाठविण्यात येत आहेत. पोखरी हवेलीतील 264 शेतकर्‍यांच्या जमिनीचे क्षेत्र प्रस्तावित आहे. पिंपरणेतील 78 शेतकर्‍यांचे क्षेत्र प्रस्तावित आहेत. अन्य गावांतीलही क्षेत्र प्रस्तावित असून त्यांना 15 दिवसांच्या आत शेतकर्‍यांकडून प्राप्त झालेल्या हरकती किंवा सूचनांची चौकशी करण्यात येणार आहे.

या रेल्वेसाठी भूसंपादन करत असताना, जर रेल्वे ही शेती क्षेत्रातून गेल्यानंतर दुतर्फा बाजूला अल्प स्वरूपात जागा सुटत आहे. या जागेचा शेतकर्‍यांना काडीमात्र फायदा होणार नाही. भूसंपादन करत असताना कुक्कुटपालन,घर,ओटा,बोअर वेल,कांद्याची चाळ,विहीरी व इतर अनेक स्वरूपात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी होण्याची शक्यता आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post