''आम्हीही राममंदिरासाठी विटा दिल्या आहेत, राममंदिर ही भाजपची खाजगी मालमत्ता नाही,


 मुंबई - अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंडाच्या खरेदीचा गैरव्यवहार समोर आला होता. राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला होता. राम मंदिरासाठीच्या भूखंडाचा हा घोटाळा बाहेर आल्यानं देशभर एकच खळबळ उडाली आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरसंघचालकांकडे खुलासा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं होतं.

‘भातखळकर, राम मंदिर ही तुमची किंवा भाजपची खासगी मालमत्ता नाही. आम्ही विटा दिल्या आहेत. शंका असेल तर शिवसेना प्रश्न विचारणार आणि संबंधितांना त्याची उत्तरे द्यावीच लागतील’, असं कडक उत्तर शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांनी भातखळकरांना दिलं आहे.

‘शिवसेनेने आता हजरत टिपूचा विचार करावा, राम मंदिराचा विचार करण्यासाठी संघ परिवार आणि हिंदू समाज सक्षम आहे. हे असले भाकड हिंदुत्ववादी, राम मंदिरावर गरळ ओकणारच. शिवसेनेच्या वक्तव्यामागे मागील प्रियंका गांधी यांची प्रेरणा आहे.  राम मंदिराला कसून विरोध करणारे आता अस्तनीतल्या निखाऱ्यांच्या मदतीने मंदिर निर्मितीत कोलदांडा घालतायत’, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली होती. त्यावर शिवसेनेच्या नेत्यानं उत्तर दिलं आहे.

दरम्यान, मागील दोन दशकापासून राजकारणाची उजवी बाजू राहिलेले अनेक पक्ष या राम मंदिराच्या मुद्यावरून सत्तेत आले. पण आता सर्वोच्च न्यायालयाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर देखील आता राम मंदिराच्या जमिनीवरून वाद होत आहेत. त्यामुळे राम मंदिर खरंच श्रद्धेचा विषय आहे की, फक्त राजकारणाचा असा मुद्दा आता उपस्थित होताना दिसत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post