धक्कादायक ; पाच शिवशाही बस पेटल्या    माय अहमदनगर वेब टीम

साताराः सातारा आगारात पाच खासगी शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली असून पाचही बस आगीत जळून खाक झाल्या आहेत. बसला आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. 

आगारात उभ्या असलेल्या पाच शिवशाही बसला अचानक आग लागल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. आगारात इतर प्रवासीही उपस्थित होते. मात्र, या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे. आगीची घटना घडताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. आग आटोक्यात आली असली तरी अजूनही मोठ्या प्रमाणात धुर धुमसत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post