सहकारी संस्थांच्या निवडणुक प्रक्रियेला ब्रेक ; 31 मार्च पर्यंत स्थगितमाय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : राज्यात कोविड-१९ चा वाढत असलेला प्रादुर्भाव आणि त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढत असलेली संख्या विचारात घेता राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका दिनांक ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. 

महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन आणि वस्त्रोद्योग विभाग यांचेकडील दि.२४ फेब्रुवारी २०२१ च्या आदेशानुसार फेब्रुवारी २०२१ मध्ये राज्यात कोविड-१९ चा वाढत असलेला प्रादुर्भाव आणि त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढत असलेली संख्या विचारात घेता, कोविड-१९ चा प्रभाव कमी करण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका सद्यस्थितीत पुढे सुरू ठेवणे उचित होणार नाही. अशी शासनाची खात्री झालेली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५७ मधील तरतुदीनुसार शासनास असलेल्या अधिकारात कलम ७३ कक मधील तरतुदी नुसार , याप्रकरणी माननीय उच्च/ माननीय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे

आदेशित केले आहे, अशा सहकारी संस्था तसेच २५० पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका दि. २४ फेब्रुवारी २०२१ पासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दिनांक ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे आदेश मिळताच जिल्हा निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर मिलिंद भालेराव यांनी सहकार महर्षी नागवडे सहकारी साखर कारखान्याची दि. २५ फेब्रुवारी रोजी होणारी सुनावणी स्थगित केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post