मसाला किंग पद्मभूषण धर्मपाल गुलाटी यांचे निधन

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली: देशातील नामांकित मसाला कंपनी महाशय दी हट्टी अर्थात एमडीएचचे प्रमुख पद्मभूषण महाशय धर्मपाल गुलाटी यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर माता चंदादेवी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्याच वर्षी धर्मपाल गुलाटी यांना व्यापार आणि खाद्यप्रक्रिया क्षेत्रातील उत्तम योगदानाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले. पद्मभूषण धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाने आर्य समाजासह देशात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

MDH मसावाले अशी ख्याती असलेल्या धर्मपाल गुलाटी यांचे हृदयविकाराने निधन झाले. आज पहाटे ५.३९ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आजारी असल्याने ते गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. 

धर्मपाल हे एक समाजसेवक देखील होते. त्यांनी अनेक शाळा आणि रुग्णालये देखील सुरू केली. करोना संसर्गाच्या काळात त्यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ७५०० पीपीई किट देखील उपलब्ध केले होते.

महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानातील सियालकोट येथे २७ मार्च १९२३ ला झाला होता. ते केवळ पाचवी पर्यंत शिकले होते. त्यांचे अभ्यासात कधीही लागले नाही. त्यांचे वडील चु्न्नीलाल यांना वाटे की त्यांनी खूप शिकावे. फाळणीनंतर ते भारतात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post