कोणाचा झाला पत्ता कट ; कोण झाले अध्यक्ष...माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली -  भारताचा माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांची भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने आज तीन जणांच्या निवड समिती सदस्यांची घोषणा केली. यामध्ये चेतन शर्मा निवड समितीचे अध्यक्ष आहेत. तर अॅबी कुरुविल्ला आणि देबाशिष मोहंती हे निवड समितीचे सदस्य असणार आहेत. सर्वाधिक सामने खेळणाऱ्या मराठमोळ्या अजित आगकरचीच निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. मदन लाल, आर.पी. सिंग आणि सुलक्षणा नाईक या क्रिकेट सल्लागार समितीने आज निवड समिती सदस्यांची घोषणा केली. यामध्ये त्यांनी चेतन शर्मा यांच्याकडे निवड समितीचे अध्यक्षपद सोपवलं आहे. ही निवड एका वर्षासाठी करण्यात आली आहे. बीसीसीआयनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

भारतीय संघाच्या निवड समितीसाठी आगरकरबरोबरच चेतन शर्मा, मनिंदर सिंग, अॅबी कुरुविल्ला, शिवसुंदर दास, देबाशिष मोहंती, रणदेब बोस, नयन मोंगिया, विजय दाहिया यांनी अर्ज केले होते. यामधून पाच जणांची सल्लागार समितीने केली होती. या पाच माजी खेळाडूंमधून तिघांना निवड समिती सदस्य म्हणून सधी दिली आहे. पण ज्या पाच खेळाडूंची सल्लागार समितीने निवड केली होती, त्यामध्ये सर्वाधिक सामने हे अजित आगरकरच्या नावावर होते. त्यामुळे आगरकरची निवड करण्यात का आली नाही, हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडेलला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post