गजकेसरी योग : 'या' ५ राशींना विशेष दिवस; आजचे राशीभविष्य

 


माय अहमदनगर वेब टीम

गुरुवार, ०५ नोव्हेंबर २०२०. चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीत विराजमान असेल. यामुळे गुरु आणि चंद्र समसप्तक स्थानी आले आहेत. गुरु आणि चंद्राच्या समसप्तक स्थानामुळे गजकेसरी योग जुळून आला आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस विशेष असेल, असे म्हटले जात आहे. तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? अन्य कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकतील? जाणून घेऊया...

आजचे मराठी पंचांग : गुरुवार, ०५ नोव्हेंबर २०२०

मेष : आनंदाची अनुभूती घ्याल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. प्रवास संभवतात. अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. महत्त्वाकांक्षी योजना पूर्णत्वास जाऊ शकतील. व्यवसायिकांनी कामाकडे लक्ष देणे हिताचे ठरेल. दिवस मनाप्रमाणे जाईल. समाज कार्य केले जाईल.

वृषभ : गृहपयोगी वस्तूंची खरेदी कराल. दिवसाच्या उत्तरार्धात पाहुण्यांचे आगमन शक्य. मंगलकार्याच्या आयोजनावर चर्चा होऊ शकेल. जीवनस्तर सुधारणाऱ्या घटना घडतील. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. सायंकाळ मौज-मजा, हास्य-विनोदात व्यतीत होऊ शकेल. जवळच्या व्यक्तीकडून फसगत होऊ देऊ नका. दक्षता बाळगा. 

मिथुन : यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. नको त्या प्रलोभनात अडकू नका. आजचा दिवस विशेष शुभ ठरू शकेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. आपली प्रगती पाहून सर्व जण आश्चर्यचकित होऊ शकतील. प्रलंबित कामे गतीने मार्गी लागतील. दिलेला शब्द पाळावा. अन्यथा प्रतिष्ठेला धक्का लागू शकेल. आरोग्याच्या तक्रारी बाबतीत तडजोड करू नका.

कर्क : भावंडांची चिंता सतावेल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्यावे. घरामध्ये काही गोष्टीत तडजोड करावी लागेल. दिवसाची सुरुवात उत्साहवर्धक असेल. विनाकारण मन विचलित होऊ शकेल. स्थान परिवर्तनावर विचार विनिमय होऊ शकेल. काही समस्यांचे निराकरण होऊ शकेल. 

सिंह : आळस झटकून कामाला लागा. नोकरीमध्ये कामाचा बोजा वाढेल. आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक ठरू शकेल. व्यवसायिकांना काही ना काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. नोकरीत केवळ कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरू शकेल. मेहनतीला पर्याय नाही, हे लक्षात ठेवून कार्यरत राहावे. तरच यश व प्रगती साध्य होऊ शकेल. 

कन्या : दिनक्रम व्यस्त राहू शकेल. धावपळ, मेहनतीचे चीज होईल. कार्यक्षेत्रातील वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहू शकेल. भाग्याची भक्कम साथ लाभेल. सकारात्मकता संचारेल. उत्साहाने कार्यरत राहाल. मित्रांची मदत मोलाची ठरू शकेल. घरातील शुभकार्य काही कारणाने खोळंबली असतील तर ती मार्गी लागतील. 

नोव्हेंबरमध्ये 'हा' रंग ठरेल अत्यंत लाभदायक? राशींनुसार जाणून घ्या

तुळ : अनामिक भीती सतावेल. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवा. एखाद्या प्रसंगामुळे मन विचलित होऊ शकेल. चिडचिडेपणा वाढू शकेल. काही ना काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. भविष्याची चिंता व्यथित करू शकेल. सारासार विचार करून मगच निर्णय घ्यावेत. साध्या मार्गाने कामे होऊ शकतात यावर विश्वास ठेवा. 

वृश्चिक : अचानक शुभवार्ता मिळतील. नकारात्मक विचार टाळावेत. प्रलंबित कामे मार्गी लागतील. धावपळीचा परिणाम आरोग्यावर होणार नाही, याकडे लक्ष देणे हिताचे ठरेल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा लाभेल. नवीन योजना अमलात येऊ शकतील. एकूणच आजचा दिवस अनुकूल असेल. घरामध्ये नवीन खरेदी होईल. 

धनु : नवीन ओळख लाभदायक ठरेल. जुनी येणी वसूल होऊ शकतील. आजचा दिवस शुभ ठरेल. संशोधनात काहीतरी नवीन गवसेल. लाभाच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. कामे पार पाडताना निष्काळजीपणा करू नये. व्यापारी वर्गासाठी प्रगतीकारक दिवस. आत्मविश्वास वाढीस लागेल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असेल. कामे धीराने घ्या. 

मकर : समाधान लाभेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. मान, सन्मान वाढीस लागतील. खरेदी-विक्री क्षेत्रातील व्यापारी, व्यवसायिकांना उत्तम लाभ मिळू शकतील. शुभवार्ता समजेल. विनाकारण तर्क-वितर्क करू नये. ग्रहांची अनुकूलता भाग्यकारक ठरेल. पर्यटनाच्या योजना आखाल. शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन संधी सापडतील. सार्वजनिक क्षेत्रात आपला प्रभाव दिसून येईल. 

कुंभ : वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण ठेवावे. वेळेचा सदुपयोग करावा. आजचा दिवस लाभकारक असू शकेल. आयात-निर्यात क्षेत्रातील व्यापारी, व्यवसायिक महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. एखाद्या धार्मिक किंवा मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. व्यवसायामध्ये तडजोड करावी लागेल. 

मीन : विद्यार्थी वर्गासाठी उत्तम दिवस. हितशत्रूंपासून सावध राहावे. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. भाग्याची योग्य स्था लाभेल. आध्यात्मिक आवड 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post