IPL 2020: मुंबईकर श्रेयसने केली मुंबई इंडियन्सची धुलाई, उभारले मोठे आव्हान

 


माय अहमदनगर वेब टीम

शारजा : मुंबईकर श्रेयस अय्यरने आजच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मुंबई इंडियन्सपुढे १५७ धावांचे आव्हान ठेवता आले होते. आयपीएलच्या आजच्या अंतिम फेरीत दिल्लीची ३ बाद २२ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर अय्यर आणि पंत या दोघांनी अर्धशतके साकारत मुंबईच्या गोलंदाजीवरच जोरदार हल्ला चढवला. या दोघांच्या दमदार फटकेबाजीमुळेच दिल्लीला मुंबईपुढे हे सन्मानजनक आव्हान ठेवता आले. श्रेयस अय्यरने यावेळी नाबाद ६५ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्याच चेंडूवर दिल्लीला धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने यावेळी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दिल्लीचा सलामावीर मार्कस स्टॉइनिसला बाद केले आणि दिल्लीला धक्का दिला. पहिल्याच चेंडूवर धक्का बसल्यावर दिल्लीचा अजिंक्य रहाणे फलंदाजीला आला. पण बोल्टने त्यानंतरच्या तिसऱ्या षटकात बोल्टने पुन्हा एकदा दिल्लीला धक्का दिला. बोल्टने यावेळी अजिंक्यला बाद करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. अजिंक्यला यावेळी दोन धावांवरच समाधान मानावे लागले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post