भाजप आक्रमक ; तहसील कार्यालयासमोर जागरण गोंधळ

 


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - नगरतालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुधाचे घसरलेले भाव, कर्जमाफी पासून वंचित राहिलेले शेतकरी, नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना न मिळालेली मदत व पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील त्रुटी अश्या अनेक मागण्यांसंदर्भात भाजपा नगर तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय, नगर येथे जागरण गोंधळ आंदोलन करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, जिल्हा उपाध्यक्ष शामराव पिंपळे, प्रदेश पदाधिकारी युवराज पोटे, रमेश पिंपळे, दिपक कार्ले, अर्चना चौधरी, नंदा चाबुकस्वार, मोहन गहिले, यांच्यासह बाप्पूसाहेब बेरड, भाऊसाहेब काळे, महेश लांडगे, राजू दारकुंडे, प्रशांत गहिले,  गोवर्धन शेवाळे, सागर भोपे, नानासाहेब बोरकर, उमेश डोंगरे, शामराव घोलप, सुभाष निमसे, पोपट शेळके, कांबळे सर, देविदास आव्हाड, बबन शिंदे, गणेश भालसिंग, भाऊसाहेब लगड, सुनील लगड, राहुल शिंदे,पोपट साठे, संदीप म्हस्के, बाळासाहेब ठोंबरे, प्रशांत कांबळे, शुभम शेळके, विजय गाडे, सचिन बोरुडे, राहुल गुंड, दत्ता वाडेकर आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना तालुकाध्यक्ष कोकाटे यांनी राज्य सरकारवर कडकडून टीका करत राज्य सरकार हे अत्यंत निष्क्रिय स्वरूपाचे सरकार असून या सरकारला शेतकऱ्यांचे घेणेदेणे नसून यांना फक्त प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यातच आनंद असून कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना राज्य सरकार व प्रशासन अतिवृष्टी, कर्जमाफी, दूध दरवाढ याबाबत फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. नगर तालुक्यातील फक्त दोन महसूल मंडलातीन पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले असून बाकी मंडलात पंचनाने करण्याचे आदेश दिलेले नाहीत हे तालुक्याचे दुर्भाग्य असल्याचे प्रतिपादन यावेळी कोकाटे यांनी केले.

नगर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे न करता आर्थिक मदत करावी, दुध दरवाढ करावी तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करावी व पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना ताबडतोब मदत मिळवून द्यावी अशी मागणी या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन भाजप रस्त्यावर उतरले असा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post