पौष्टिक, स्वादिष्ट आणि सुरक्षित दिवाळी साजरी करा

 


माय अहमदनगर वेब टीम

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण तसंच स्वादिष्ट पक्वान्न आणि मिठाईची मेजवानी. दिवाळी म्हटलं की बहुतांश लोकांच्या डोक्यात सर्वप्रथम मिठाईचाच विचार येतो. मिठाईची चव चाखायला प्रत्येकालाच आवडते. खरंतर दिवाळीमध्ये चमचमीत पक्वान्नांचा आस्वाद घेण्याचा मोह आवरता येणं कठीणच.

माझा सल्ला: पदार्थांचा आस्वाद घ्या, पण मर्यादित स्वरुपात. महत्त्वाचे म्हणजे यंदा आरोग्य आणि स्वच्छतेकडे विशेष अधिक लक्ष द्या. दरम्यान ऑफिसचे काम आणि दैनंदिन जीवनशैलीच्या वेळापत्रकात इतका बदल झाला आहे की घरामध्ये फराळ तयार करणे; त्याचबरोबर आरोग्य, पोषण तत्त्व व पदार्थांची चव यांच्यात संतुलन राखणे अवघड ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर पौष्टिक, चविष्ट आणि महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित व निरोगी राहून दिवाळी साजरी करण्याचा सोपा आणि साधा मार्ग आपण जाणून घेऊया.

पदार्थांना पौष्टिक बनवा : सणासुदीच्या काळात पूर्णतः मिठाई वर्ज्य करणं कठीण आहे, याची मला जाण आहे. मग यास पर्याय म्हणून तसंच जीभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण एखाद्या हेल्दी पर्यायाचा विचार करू शकता. तळलेल्या करंजी, चकलीऐवजी बेक्ड खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा. तसंच बदाम, अक्रोड आणि नैसर्गिक साखरेचा स्रोत म्हणून अंजीरचा आहारामध्ये समावेश करण्याचा विचार करावा. दुसरा पर्याय म्हणजे पॅक केलेले मिष्ठान्न खरेदी करणे, उदाहरणार्थ आईस्क्रीम, ज्यांच्या लेबलवर त्यात वापरल्या गेलेल्या सामग्रींची पौष्टिक माहिती नमूद केलेली असते, जेणेकरुन लोकांना कुठले पदार्थ किती खावे हे निश्चित करता येते.

साधे पण चवदार पदार्थ तयार करा : गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्यापैकी बहुतांश जणांनी स्वतःच्या लाइफस्टाइल आणि वेळापत्रकामध्ये बरेच बदल केले आहेत. घरातच असल्याने कित्येकांच्या दैनंदिन कामांमध्येही वेगवेगळ्या स्वरुपात वाढ होत आहे. घराची साफसफाई, होम स्कूलिंग आणि वर्क फ्रॉम होम. असं म्हणू शकतो की अजूनही आपल्याला बरीचशी कामे आहेत. तर यावर मी असे सुचवेन की, आपण कमी प्रमाणात मिठाई तयार करून स्वतःवरील कामाचा भार कमी करावा आणि वेळ वाचवण्यासाठी 'मिक्स अँड मॅच' सामग्रींचा उपयोग करून स्वादिष्ट पदार्थांसाठीचा सोपा मार्ग शोधून काढावा. उदाहरणार्थ, काही ड्राय फ्रुट्स चॉप करा आणि त्यांना गार्निश म्हणून आईस्क्रीमवर वापरा.

सुरक्षित ठेवा : यंदा आपण कोणतेही खाद्यपदार्थ खरेदी करताना तसंच खाताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. स्थानिक दुकानामधील उघड्यावरील मिठाई खरेदी करण्यापेक्षा घरच्या घरी पदार्थ तयार करणं आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ठरेल. पण घरामध्येच सर्व पदार्थ तयार करणं देखील त्रासदायक ठरू शकते. माझ्या अनुभवानुसार, पाकीटबंद व फ्रोजन खाद्यपदार्थ व डेझर्ट हा या समस्येवर सोपा उपाय आहे. कारण यांच्या उत्पादनादरम्यान स्वच्छतेच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केले जाते. तर तुम्ही सेवन करत असलेले खाद्यपदार्थ चविष्टच नव्हे तर सुरक्षित देखील आहेत, याची आपण खात्री बाळगू शकता

या लेखातील माहिती रितिका समद्दार (मुख्य आहारतज्ज्ञ, मॅक्स हेल्थकेअर, साकेत, नवी दिल्ली) यांनी दिलेली आहे.

डिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमकडून प्रकाशित करण्यात आली आहे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post