एक्साईड कंपनीतील कामगारांची दिवाळी गोड - पै. दत्ता तापकीरे स्वराज्य कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश कामगारांना भरघोस बोनस खात्यावर जमा

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - स्वराज्य कामगार संघटनेच्यावतीने एमआयडीसी येथील एक्साइड कंपनीतील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना भरघोस असा बोनस देण्यात आला यामध्ये स्वराज कामगार संघटनेचे अध्यक्ष पै.दत्ता तापकीरे यांनी वेळोवेळी व्यवस्थापनाशी चर्चा करून व वेळोवेळी मीटिंग घेऊन  भरघोस असा बोनस मिळून दिला खऱ्या अर्थाने कामगारांची दिवाळी गोड झाली आहे हे सर्व करत असताना शहराचे आमदार संग्राम जगताप व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले व संघटनेतील पदाधिकारी उपाध्यक्ष किरण दाभाडे, जनरल सेक्रेटरी पै.सुनील कदम, खजिनदार दत्ता सोनवणे, कार्याध्यक्ष दीपक गांगर्डे आदी सह कामगार प्रतिनिधी बाबासाहेब गायकवाड, किसन तरटे, सुधाकर तामखडे, अशोक म्हस्के, दिनेश वाघ, सुनिल देवकुळे, गौतम भालेराव आदींनी यासंदर्भात पाठपुरावा केला व सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर बोनस जमा झाल्यामुळे एक्साइड कंपनी च्या बाहेर फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला. स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने एक्साइड कंपनी मधील सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली असून सर्व कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच व्यवस्थपणेचे पै दत्ता तापकीरे आणि कामगारांनी  आभार मानले

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post