कंगना गोत्यात ; तिच्यासह बहिणीविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात FIR दाखल

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहिण रंगोली चांडेल विरोधात मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आला आहे. १२४ अ सह विविध कलमांतर्गत कंगना विरोधात एफआयआर दाख झाला आहे. वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना अभिनेत्री कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला होता. कंगना आणि रंगोली ट्विट आणि मुलाखतींच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप आहे.


वांद्रे कोर्टात कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढही निर्माण करत आहे. कंगना वारंवार आक्षेपार्ह ट्विट करत असून यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर केले. त्यानंतर कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post