म्हणून अमेरिका भारताला देणार शक्तिशाली ड्रोन


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - अमेरिका भारताला शक्तिशाली ड्रोन पुरवणार आहे. यामाध्यमातून एकावेळी 450 किलोपेक्षा अधिक वजनाचे बॉम्ब, क्षेपणास्त्र वाहून नेता येणार आहे. यासाठी अमेरिकेने आपले काही नियमही बदलवले आहेत, हे विशेष. कारण विदेशी भागीदारांना ड्रोनसारखी शस्त्रास्त्रे विकण्यास बंदी होती. ट्रम्प यांनी हा कायदा प्रथमच बदलला आहे.

लडाखच्या गलवान खोर्‍यात जवानांवर भ्याड हल्ला केल्यानंतर भारताने चीनविरोधात जोरदार पाऊल उचलले आहे. आर्थिक नाड्या आवळत असतानाच फ्रान्सकडून राफेलसारखा लढवय्या साथीदार मिळवला आहे. यामुळे चीन आणखी भडकला आहे. शिवाय लडाखमध्येही नामुष्की पत्करावी लागली असून, चिनी सैन्याने काढता पाय घेतला आहे. या संपूर्ण घडामोडींवर सशस्त्र ड्रोन मिळण्याची योजना महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

अमेरिकेच्या विदेशी धोरणासंबंधी नियतकालिकाने या संदर्भात माहितीत म्हटले की, ट्रम्प प्रशासनाने भारत आणि चीनमधील हिंसक हल्ल्यावरून भारताला शस्त्रास्त्रे विकण्याची नवीन योजना बनवली आहे. सशस्त्र ड्रोनसारखे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि अद्ययावत यंत्रणेचा समावेश आहे. एका सिनेट सदस्याने सांगितले की, आम्ही भारताला सशस्त्र श्रेणी 1 ची शस्त्रे देणार आहोत. यात एमक्यू-1 प्रीडेटर ड्रोनचा समावेश असून, त्याच्याकडून 450 किलोपेक्षा अधिक वजनाचे बॉम्ब तसेच क्षेपणास्त्र वाहून नेता येणार आहे.

दरम्यान, भारताला पाच लढाऊ राफेल विमाने मिळाली असल्याने हवाईदलाची ताकद कित्येक पटींनी वाढली आहे. एकूणच चीनसोबत चाललेल्या तणावाच्या काळात अमेरिका आणि भारत आपली शस्त्रास्त्रशक्ती वाढवण्याची तयारी करत असल्याचे आंतरराष्ट्रीय जाणकारांचे मत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post