स्लीप अॅपनिया झोपेशी संबंधित एक गंभीर आजार. स्लीप अॅपनियाच्या या स्थितीत आपली झोप वारंवार मोडते. काही वेळा तर श्वास रोखला जाऊ शकतो. आपण अनेकदा दोन्ही कुशींवर वळतो. तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की देशाची १३ टक्के लोकसंख्या ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅपनियाने पीडित आहे. पुरुषांत हा आकडा १९.७%, महिलांत तो ७.४ % आहे. स्लीप अॅपनियाच्या स्थितीत एका तासात तीस किंवा त्यापेक्षा जास्त वेळ श्वास रोखणे किंवा कूस बदलणे यासारखी स्थिती निर्माण होऊ शकते. झोपेशी संबंधित आणखी समस्या निर्माण होऊ शकतील असा हा विकार आहे.
उदाहरणार्थ संशोधने असे सांगतात की, तुमची रात्रीची झोप एक तास जरी कमी झाली तरी दुसऱ्या दिवशी तुमचा अलर्टनेस ३२ टक्के कमी होतो. स्लीप अॅपनियाबाबत जाणून घेण्याआधी झोपेबाबत जाणून घेणे आवश्यक आहे. आपली झोप तीन ते चार चक्रांत पूर्ण होते. प्रत्येक चक्र जवळपास पाच टप्प्यांतून जाते. चौथा टप्पा सर्वात गाढ झोपेचा असतो. पाचवा टप्पा REM किंवा रॅपिड आय मूव्हमेंटचा टप्पा असतो. या टप्प्यातच आपण स्वप्नंही पाहतो. झोपेच्या वेळेसच आपल्या शरीरात ग्रोथ हार्मोन प्रवाहित होत असतात. त्याद्वारे शरीराच्या दैनिक क्रिया होत असतात. झोपेदरम्यान शारीरिक तापमान कमी होते. हृदय गती आणि रक्तदाब कमी होतो. त्यामुळे हृदयाला विश्रांती मिळते.
स्लीप अॅपनियामध्ये अनेकदा झोपमोड होते. त्यामुळे या सर्व प्रक्रियांत अडथळा येतो. अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनच्या एका शोधानुसार, कोविड-१९ च्या या टप्पात स्लीप अॅपनियाची तक्रार आणखी वाढू शकते. स्लीप अॅपनिया काय आहे आणि तो कशा प्रकारे आपल्या शरीरावर प्रभाव टाकतो हे आपण येथे समजून घेऊ.
स्लीप अॅपनिया व त्याच्याशी संबंधित धोका ६ प्रश्नोत्तरांमधून जाणून घेऊ
1. स्लीप अॅपनिया म्हणजे काय?
ही एक प्रकारची झोपेची अव्यवस्था आहे. काही लोकांत पाठीवर झोपल्यामुळे गळ्याच्या मुक्त पेशी गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे गळ्याच्या मागच्या भागात पसरतात व झोप शिथिल झाल्यास श्वसन मार्गात मध्यभागी खेचल्या जातात. या खेचण्यामुळे हवेचा प्रवाह आंशिक वा पूर्ण बाधित होऊ शकतो. त्यामुळे फुप्फुसात ऑक्सिजनची उणीव जाणवते. मेंदू ही कमतरता दहा सेकंदच सहन करू शकतो. मग मेंदू झोप मोडतो. झोपमोड होताच श्वसनमार्ग पुन्हा खुला होतो. या चक्राला स्लीप अॅपनिया म्हणतात.
2. काय आहेत प्रमुख लक्षणे ?
- घोरणे हे एक प्रमुख लक्षण असू शकते, मात्र सर्व प्रकरणांमध्ये घाेरण्याचा संबंध स्लीप अॅपनियाशी नसतो.
- झोपेत काही वेळेसाठी श्वास गुमरल्यासारखे वाटणे.
- श्वास घ्यायला त्रास झाल्याने झोप मोडणे
- सकाळी डोकेदुखी. दिवसा जास्त झोप येणे.
- कारण स्लीप अॅपनियामुळे संपूर्ण झोपेचे चक्र गडबडून जाते. अशा परिस्थितीत चिडचिड सुरू होते आणि एकाग्रता कमी होऊ लागते.
3. यावर उपचार काय?
ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप अॅपनियासाठी सर्वोत्तम उपचार सीपीएपी (कन्टिन्युअस पॉझिटिव्ह एअरवेज प्रेशर) थेरेपी मानले जाते. त्याच्या मदतीने श्वास घेणारे वायुमार्ग खुले ठेवण्यासाठी एअर प्रेशरचा वापर केला जातो. हा उपचार खूप स्वस्त आणि प्रभावी आहे. शस्त्रक्रिया केली जाते, पण हा उपचार खूपच खर्चिक आहे. त्यात काही जोखीमही असू शकते.
4. याचे धोके कोणते?
स्लीप अॅपनिया एक धोकादायक आरोग्य समस्या आहे. त्यामुळे धोकादायक हृदयरोग व पक्षाघात यासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
5. स्लीप अॅपनियाचे प्रकार किती?
सेंट्रल
जेव्हा आपला मेंदू श्वास घेणाऱ्या मांसपेशींना निर्देश देऊ शकत नाही तेव्हा हा होतो. त्यामुळे श्वास घेण्याची प्रक्रिया अवरुद्ध होत जाते.
मिक्स्ड
जेव्हा सेंट्रल आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅपनिया दोन्ही एकत्र झाले झाले तर त्याला स्लीप अॅपनिया म्हटले जाते. ही एक अत्यंत गंभीर स्थिती आहे.
ऑब्स्ट्रक्टिव्ह
मेंदू मांसपेशींना श्वास घेण्याचे निर्देश तर देतो, पण वायुमार्गात कुठल्याही प्रकारच्या अडथळ्यामुळे मांसपेशी श्वास घेण्यात अयशस्वी होतात.
6. घोरण्याचा याच्याशी काय संबंध?
घोरणे स्लीप अॅपनियाचे लक्षण असू शकते, परंतु ते स्लीप अॅपनियाशिवायही असू शकते. घोरणे ही नैसर्गिक क्रिया आहे.
धोका सर्वात कमी झोप घेणाऱ्यांत भारतीयांचे स्थान जगात दुसरे
फिटबिटद्वारे १८ देशांत केलेल्या अध्ययनानुसार कमी झोपेच्या बाबतीत भारतीय दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एक भारतीय सरासरी ७ तास १ मिनिट झोपू शकतो. जपानी लोक आपल्यापेक्षा कमी म्हणजे फक्त ६ तास ४१ मिनिटे झोप घेतात.
७७ मिनिटांची गाढ झोप
गाढ झोपेच्या बाबतीत भारतीय खूपच मागे आहेत.भारतीय रात्रभर सरासरी ७७ मिनिटांची गाढ झोप घेू शकतात. सिंगापूर, पेरू आणि हाँगकाँगचे लोकही सर्वात कमी झोपणाऱ्यांच्या यादीत आहेत. अपुऱ्या झोपेमुळे भारतीयांमध्ये स्लीप डिसऑर्डर दिसून येतो. ही आकडेवारी फिटबिटद्वारे १ ऑगस्ट २०१८ ते ३१ जुलै २०१९
Post a Comment