...म्हणून खासदार विखेंनी केली तक्रारअहमदनगर - नॅशनल हेल्थ मिशनकडून कोविड उपचार सुविधांसाठी जिल्ह्याला आलेल्या 18 कोटी रुपयांच्या निधीतून होत असलेल्या कामांबाबत व खासदार म्हणून यात आपल्या सूचनांची दखल जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात नसल्याची तक्रार नॅशनल हेल्थ मिशन व केंद्रीय आरोग्य मंत्रालय अंतर्गत असलेल्या आरोग्य समितीकडे केली असल्याची माहिती खा.डॉ.सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.दरम्यान मिशन व समितीकडे तक्रार केल्यानंतर तेथे झालेली चर्चा व निर्णयाबाबत गोपनीयता शपथ घेतल्याने मी त्यावर भाष्य करणार नाही, असेही तेे म्हणाले.

डॉ. विखे म्हणाले, मी जिल्ह्यात नव्हे तर केवळ नगर मनपा हद्दीत लॉकडाऊनची गरज व्यक्त केली होती. रोजगार, उद्योग व्यवसायावर लॉकडाऊनचा परिणाम होणार, हे खरे असले, तरी सध्याच्या काळात रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध व त्यांच्यावर उपचार गरजेचे आहेत. समाजात 90 टक्के लोक मास्क, सोशल डिस्टन्स, सिनिटायझेशन नियम पाळतात. पण 10 टक्के समाजकंटक नियम पाळत नाहीत त्यामुळे कोरोना अशा लोकांनमुळे वाढत असलायचे त्यांनी सांगितले.
प्रपंच चालवण्यासाठी मी खासदार झालो नाही. जनतेने ज्या हेतूने मला निवडून दिले, त्याला न्याय देऊ शकत नसल्याने हतबलता व्यक्त केली होती. जिल्हाधिकारी द्विवेदी व मी मित्र आहोत, आमच्यात संवादही आहे. डॉक्टर म्हणून माझ्याकडून सर्व जाणून घेतले जाते. पण होत काहीच नाही. त्यामुळे सुजय म्हणतो, तसे करू नका म्हणून त्यांना कोणी फोन करते काय, याची शंका वाटते. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे ट्रेसिंग करण्यासाठी 5 दिवस कडक लॉकडाऊनची मागणी होती. पण ती टाळली गेली, त्याचे परिणाम दिसत आहेत, रोज रुग्ण संख्या शेकड्याने वाढत असल्याचेही खा.विखे म्हणाले. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post