फोर्ब्जची मौल्यवान ब्रँडची यादी जाहीर, अॅपल मौल्यवान कंपनी नाही



माय अहमदनगर वेब टीम
जगभरातील व्यवसाय व व्यावसायिकांचा अभ्यास करणाऱ्या प्रतिष्ठित फोर्ब्ज मासिकाने मौल्यवान ब्रँडची वार्षिक यादी जाहीर केली आहे. १०० ब्रँडच्या यादीत अॅपल ही दिग्गज कंपनी सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून आघाडीवर आली आहे. त्यांची ब्रँड व्हॅल्यू १७%नी वाढून १८ लाख कोटी रुपये इतकी झाली, तर २४% (१५ लाख कोटी रु.) वाढीस गुगल दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्ट आहे. त्यांचे ब्रँड मूल्य १२ लाख कोटी रुपये आहे. त्यांनी ३० % वाढ नोंदवली. यादीतील पहिल्या पाच कंपन्यांनी गेल्या वेळची रँकिंग कायम ठेवली आहे. यामध्ये अॅपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन व फेसबुकचा समावेश आहे. फेसबुकची ब्रँड व्हॅल्यू २१%नी घसरली. ती ५ लाख कोटी रुपये राहिली.

नव्या कंपन्यांचा समावेश

यादीत काही कंपन्या प्रथमच समाविष्ट झाल्या आहेत. उदा. निटेंडो, बर्गरकिंग, हेन्नसीव एएक्सए इत्यादी. यावेळी फिलिप्स, एचपी आदी बाहेर गेल्या.

डिजिटल पेमेंटमुळे वाढली अनेक कंपन्यांची व्हॅल्यू

यादीत २० कंपन्यांसह टेक्नॉलाॅजी सेक्टर आघाडीवर राहिले. १४ कंपन्यांसह आर्थिक सेवा क्षेत्र दुसऱ्या, ११ कंपन्यांसह ऑटो सेक्टर तिसऱ्या व ८ कंपन्यासह रिटेल सेक्टर चौथ्या क्रमांकावर आहे. अॅमेझाॅन, नेटफ्लिक्स व पेपाल यांनी गेल्या वर्षांच्या तुलनेत जबर उसळी घेतली.

विशेष बाबी 
> १०० सर्वात मौल्यवान ब्रँडची एकूण किंमत १९० लाख कोटी रुपये (२.५४ ट्रिलियन डॉलर) अाहे. गेल्या वर्षी १७४ लाख कोटी रू.(२.३३ ट्रिलियन डाॅलर) होती.

> यादीत अमेरिकेच्या ५०, जर्मनीच्या १०, फ्रान्सच्या ९, जपानच्या ६ व स्वित्झर्लंडच्या ५ कंपन्या आहेत.

महत्त्वपूर्ण चढ-उतार

नेटफ्लिक्स ३८ व्याहून २६ व्या, तर अदिदास ६१ व्या पासून ५१ व्या क्रमांकावर आली. चॅनेल ७९ व्या स्थानापासून ५२ व्या व कार्टर ६४ वरून ५६ व्या स्थानावर गेली. काही कंपन्यांची व्हॅल्यू घटली आहे. जीई १४%, एचपी इंक १२% व आयबीएम १०% नी घटली आहे.

मूल्यात सर्वाधिक वाढ

> नेटफ्लिक्स 72% > चॅनेल 42% > अॅमेझॉन 40% > मायक्राेसाॅफ्ट 30% > पेपाल 24%

मूल्यात सर्वाधिक घसरण

> फेसबुक -21% > वेल्स फार्गाे -16% > मर्सिडीझ बेंझ -14% > फाेर्ड -14% > जीई -14%

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post