जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा शुक्रवार

 


माय अहमदनगर वेब टीम

शुक्रवार, 28 ऑगस्ट रोजी सूर्योदय मूळ नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून आज प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावातून 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. तर उर्वरीत 4 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा ठरेल.

राशीनुसार असा राहील तुमचा दिवस

मेष: शुभ रंग : लाल | अंक : १

अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.

वृषभ: शुभ रंग : सोनेरी | अंक : ५

नोकरीच्या ठीकाणी स्वत:चे महत्व सिध्द करायचे असेल तर वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत.कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : २

महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे.आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्वापूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या.

कर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : ४

आज अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. ताकही फूंकून प्या.

सिंह : शुभ रंग : आकाशी| अंक : ६

व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकनदारांच्या गल्ल्यात लक्षणिय वाढ होईल. नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ३

कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा जोर वाढलेला आहे. नोकरीत हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागेल. काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे.

तूळ : शुभ रंग : चंदेरी| अंक : ७

आवक पुरेशी असेल. अधुनिक राहणीमानाची आवड जाेपासाल. उच्चशिक्षण घेणाऱ्यांच्या अपेक्षा वाढतील. एखाद्या नवीन विषयात गोडी निर्माण होईल.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : ५

कौटुंबिक जिवन समाधानी असल्याने तुम्ही घराबाहेरही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज पैशाची कमतरता भासणार नाही. आज आईचे मन दुखाऊ नका.

धनू : शुभ रंग : हिरवा| अंक : ८

तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. आज भावंडांमधे सामंजस्य राहील. गृहीणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत.

मकर : शुभ रंग : भगवा | अंक : ९

काही दूरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.

कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ३

तरुणांनी मौजमजा करताना नितिमत्तेचे भान ठेवावे. उध्दटपणास लगाम गरजेचा आहे. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५

पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. आपल्या अधिकारांचा दूरुपयोग टाळावा. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी हवी.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post